नवीन पिक विमा योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे टाळता न येण्यासारखे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी/लावणी/उगवण न झाल्यास-
हंगामामध्ये अपपूरा पाऊस झाल्यावरती, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अनुसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील.
हंगामात प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेले नुकसान-
हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत, मात्र सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस अगोदरपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळी इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांचा अपेक्षित उत्पादनामध्ये मागील लगतच्या 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण दिले जाते. त्यावेळेस विमा संरक्षण देण्यात येते.
पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये पिकांच्या उत्पादनात येणारी घट-
दुष्काळामुळे, पावसामधील खंड, पूर, क्षेत्र, जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट व चक्रीवादळ या सारख्या टाळता नाही येत अशा जोखमींमुळे पिकांच्या उत्पादनामध्ये येणाऱ्या घटीसाठी व्यापक विमा संरक्षण दिले जाते.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती-
यामध्ये गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा विज कोसळल्यामुळे लागलेली नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या अधिसूचित पिकांचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित केले जातात.
काढणीनंतर नुकसान-
ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून किंवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे गरजेचे असते. अशा कापणी/काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्याच्या आत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांच्या अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते.
सर्वसाधारण अपदवाद-
वरील सर्व विमा संरक्षणाच्या बाबी युद्ध व अनुयुद्धाचे दुष्परिणाम, हेतूपरस्पर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यास लागू असणार नाहीत. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये विमा संरक्षण दिले जाणार नाही.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

