ऊस विकास योजनेचा लाभ कसा घ्यावा?

राज्यामध्ये उसाची लागवड ही सरासरी 11.67 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये होते. त्यामधून सरासरी उत्पादकता 90 मे. टन प्रती हेक्टर मिळते. सन 2024-25 मध्ये ऊस पिकाचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्याचबरोबर ऊस उत्पादकतेमध्ये वाढ करण्याच्या हेतूने राज्यात अन्न व पोषण सुरक्षा-व्यापारी पिके कार्यक्रमांच्या माध्यमातून ऊस विकास योजना कार्यक्रम राबवण्याली जात आहे. या योजनेतंर्गत एक डोळा पद्धत, पट्टा पद्धतीचा वापर करून आंतरपीक प्रात्यक्षिके, ऊती संवर्धित रोपांची निर्मिती, मनुष्यबळ विकास, पीक संरक्षण औषधे व बायो-एजंटसचे वितरण हे घटक राबवले जातात. ऊती संर्वधनामुळे ऊसाच्या सुधारित वाणाची निरोगी रोपे तयार करून ठिकठिकाणी त्यापासून बेणे मळे तयार करणे सुलभ होत आहे. या योजनेमध्ये लाभार्थी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यादींना लाभ घेता येणार आहे.

सदर योजनेचे उद्दिष्ट-

  • उसाच्या उत्पादन खर्चात यामुळे बचत करून उत्पादकता वाढणार आहे.
  • दर्जेदार बेण्याच्या वापराला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे व यासाठी ऊती संवर्धित बेणे निर्मिती करून शेतकऱ्यांना ते अनुदानावरती उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आंतरपिकाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत.

सदर योजनेमध्ये समाविष्ट असणारे जिल्हे-

  • नंदुरबार
  • अहिल्यानगर
  • सोलापूर
  • कोल्हापूर
  • जालना
  • बीड
  • लातूर
  • धाराशिव

सदर योजनेच्या समाविष्ट बाबी व अनुदान दर खालीलप्रमाणे-

  • एक डोळा पट्टा पद्धतीचा अवलंब व आंतरपीक प्रात्यक्षिके- रु. 9,000/ हेक्टर
  • मूलभूत बियाणे उत्पादनासाठी अर्थसहाय्य (कृषी विद्यापीठ प्रक्षेत्र)‌- रु. 40,000/ हेक्टर  
  • ऊती संवर्धित रोपे- रु. 3.50/ रोप
  • पीक संरक्षण औषधे व बायो-एजंटसचे वितरण- रु. 500/ हेक्टर
  • राज्यस्तरीय अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण- रु. 40,000/ प्रशिक्षण
  • पाचट व खोडवा व्यवस्थापन प्रात्यक्षिके- रु. 6,000/ हेक्टर
  • सुपरकेन नर्सरी- रु. 10,000/ हेक्टर

सदर योजनेचा अर्ज कसा करावा-

  • गट लाभार्थ्यानी या योजनेच्या लाभासाठी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या अधिकृत संकेतस्थळावरती अर्ज करावा.
  • या योजनेच्या लाभार्थ्याची प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर निवड केली जाणार आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *