वीज पडून दगावलेल्या जनावराला शासनाकडून किती मदत देण्यात येते? याचा लाभ कसा घ्यावा?  

मागच्या काही वर्षांमध्ये हवामानात बदल झालेला आहे. अवकाळी पावसामुळे वादळी वारा व वीजांचा कडकडाट होऊन मोठा पाऊस पडत आहे. शेतकरी त्याचबरोबर जनावरे यांचा वीज पडून दगवण्याचे प्रमाण देखील यामुळे वाढले आहे. वीज पडून दगावलेल्या जनावरांसाठी नैसर्गिक आपत्ती मधून मदत उपलब्ध करून देण्यात येते. नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचे नुकसान झाल्यावरती किंवा अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी तसेच भूमिहीन पशुपालकांना शासनाच्या निर्णयानुसार मदत देण्यात येते. त्यासाठी जनावरे दगावले असल्यास तलाठी यांचा पंचनामा त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी यांचा पोस्टमार्टम अहवाल सादर करणे गरजेचे आहे.

किती मदत दिली जाते-

  • दुधाळ जनावरे-

म्हैस, गाय, उंट यांच्यासाठी 30,000 रुपये

मेंढी, बकरी, डुक्कर यांच्यसाठी 3,000 रुपये

  • ओढकाम करणारी जनावरे-

उंट, घोडा, बैल यांच्यासाठी 25,000 रुपये

वासरू, गाढव, शिंगरू, खेचर यांच्यासाठी 16,000 रुपये

लागणारी आवश्यक कागदपत्रे-

जनावरांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काही गरजेची कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने साध्या कागदावर अर्ज करावा लागतो किंवा आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांना तोंडी माहिती द्यावी लागणार आहे.

जनावरांची ऑनलाईन नोंदणी गरजेची-

  • जनावरांचा ऑनलाईन टॅगिंगच्यामाध्यमातून ओळख देणे हा या मागचा हेतू आहे, परंतु अजूही बऱ्याच पशुपालकांनी टॅगिंग करण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. यामुळे अनेकदा नुकसान होत असते.
  • पशुपालकांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व पशुधनाचे टॅगिंग करुन घ्यावे. वासरे/करडे जन्मल्यानंतर एक महिन्यांमध्ये त्यांचे टॅगिंग करणे गरजेचे आहे.
  • टॅगिंग केल्यामुळे आपल्या जनावरांना एक ओळख मिळते व तसेच जनावरांनी दिलेल्या उत्पन्नाविषयी नोंदणी करणे सोपे होते.
  • कोणत्या जनावरांची उत्पादनानुसार निवड करायची याबद्दल देखील यामुळे माहिती मिळते.
  • जर पशुपालकाच्या गोठ्यामधील एखादे जनावर दगावल्यास टॅगिंग असेल तर सरकारकडून त्याला आर्थिक मदत मिळवणे, विमा रक्कम मिळवणे किंवा काही सवलती मिळविण्यास मदत मिळते.

जनावरांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी?-

  • जनावरांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवरती नोंदणी करावी लागते.
  • तेथे जनावरांचे वय, जात, लिंग, मालकाची माहिती व इतर आवश्यक तपशील हा भरावा लागतो.
  • नोंदणी झाल्यावरती तुम्हाला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात येतो.
  • नजीकच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून आपल्या जनावरांना टॅग मारून घ्यावा.
  • शेळ्यांसाठी लहान टॅग व गाई म्हशींसाठी मोठी टॅग उपलब्ध आहेत.
  • टॅगिंग केल्यानंतर आपल्या पशुधनाबाबत सर्व नोंद ही ऑनलाईन ठेवण्यात येते.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *