“किसान क्रेडिट कार्ड” ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. ही योजना खास शेतकऱ्यांना वेळेवर व सुलभ कर्ज पुरवठा करण्यासाठी राबवण्यात येते. शेतमाल उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चाबरोबर अन्य कृषी संबंधित गरजांनाही या योजनेतंर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येतो. आज आपण सदर लेखातून या योजनेचे फायदे, पात्रता, निकष, आवश्यक कागदपत्रे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
सदर योजनेची माहिती-
किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली नाबार्ड व मॅनेज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येते. या योजनेच्या मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना अल्पकालीन व सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे. त्यामुळे शेतीसाठी लागणारा खर्च वेळेवर पूर्ण करता येतो.
सदर योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये-
- उत्पादन खर्चासाठी कर्ज- या योजनेच्या माध्यमातून पिकाच्या लागवडीसाठी व खत, बियाणे, कीटकनाशके यांसाठी लागणारा खर्च दिला जातो.
- पीक कापणीनंतरचा खर्च- साठवण, वाहतूक प्रक्रिया व विक्रीसाठी लागणारा खर्च या योजनेच्या माध्यमातून दिला जातो.
- शेतीशी संबंधित वैयक्तिक गरजा- शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन खर्चासाठी मर्यादित रक्कम या योजनेमार्फत देण्यात येते.
- शेतीच्या मालमत्तेची देखभाल व पूरक उद्योगांसाठी या योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो.
सदर योजनेची पात्रता-
- ज्या व्यक्तीच्या नावे स्वतःची जमीन आहे, असे शेतकरी या योजनेच्या लाभास पात्र आहेत.
- सहकारी शेती करणारे शेतकरी
- शेती भाड्याने घेतलेली असली तरी काही अटीनुसार पात्र ठरू शकणारे शेतकरी
- नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था किंवा समूह
सदर योजनेची कर्ज मर्यादा वर परतफेड कालावधी-
- कर्ज मर्यादा- पीक पद्धती, शेती क्षेत्रफळ, स्थानिक खर्चाचा अंदाज यानुसार निधी ठरवण्यात येतो.
- परतफेड कालावधी- कर्जाची पुनरावलोकन कालावधी हा 5 वर्ष आहे. दरवर्षी त्यामध्ये बदल होऊ शकतो.
- कोलॅटरल फ्री कर्ज- रु.2 लाखापर्यंतचे कर्ज हमीशिवाय उपलब्ध होते.
- वेळेवर परतफेड करणाऱ्यासाठी व्याज सवलत/अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
सदर योजनेचे फायदे-
- बँकेमध्ये वारंवार कर्जासाठी धावपळ करावी लागत नाही.
- एकाच कार्डचा वापर वर्षभर करुन कधीही निधी आपल्याला काढता येतो.
- पैसे बँकेत ठेवून व्याज मिळवण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.
- कृषी वस्तू खरेदीसाठी कार्डचा थेट वापर करता येतो.
- कमी व्याजदर व वेळेवर परतफेडीवरती प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
सदर योजनेची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया-
- किसान क्रेडिट कार्डचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सरकारचे अधिकृत जन समर्थ पोर्टल वापरले जाते. अधिकृत लिंकवरती जाण्यासाठी येथे क्लिक करावे.
- त्यानंतर डाव्या बाजूला आपली मराठी भाषा निवडायची आहे.
- किसान क्रेडिट कार्डसाठी अर्जदाराची पात्रता देखील तपासणे गरजेचे असते. त्यासाठी KCC Crop Loan या पर्यायावरती क्लिक करावे, तेथे आपले राज्य व जिल्हा निवडायचा आहे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर पुढे अर्जदार लॉगिन करण्यासाठी नोंदणी करून लॉगिन करायचे आहे. तुम्ही पात्र असल्यास ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे किसन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.
- अर्ज भरण्याचे सर्व टप्पे पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत व अर्ज सादर करावा.
- अर्जाचे स्टेटस या टॅबमध्ये पाहता येते.
सदर योजनेचे आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- सातबारा उतारा/जमीन कागदपत्रे
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (काही वेळा)
सदर योजनेचा अर्ज सादर केल्यानंतर काय?-
- अर्ज सादर केल्यानंतर अर्ज क्रमांक मिळतो.
- बँकेकडून कागदपत्राची पडताळणी करण्यात येते.
- योग्यतेनुसार मंजुरी देण्यात येते व कार्ड जारी करण्यात येते.
- ई-मेल व मोबाईलद्वारे अपडेट्स मिळत राहतात.
मदतीसाठी संपर्क-
जरा अर्ज करताना काही अडचण आली तर आपण customer.support@jansamarth.in या ई-मेल आयडीवरती किंवा +91 7969076111 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधू शकता.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

