HSRP नंबर प्लेट बसवण्यास चौथ्यांदा मुदतवाढ?

HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या मुदतीबाबत मोठी घडामोडी झाल्याचे समोर आलेले आहे. परिवहन खात्याच्या माध्यमातून ही पाटी लावण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामुळे लक्षावधी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कोणत्या तारखेपर्यंत ही पाटी बसवता येणार आहे, याबद्दलची आपण सदर लेखातून माहिती जाणून घेणार आहोत. आता उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ मिळालेले आहे. या अगोदर 15 ऑगस्टपर्यंत ही पाटी लावण्याची मुदत होती.

परंतु 70 टक्के वाहनांना पार्टी लागली नसल्यामुळे वाहनांवर कोणती कारवाई होणार? याकडे लक्ष लागले होते. आता नवीन घडामोडीमुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील 20 टक्केच वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्यात आलेले आहे. दहा टक्के वाहनधारकांनी पाटी लावण्यासाठी वेळ घेतलेली आहे. परंतु 70 टक्के वाहनांना अजूनही उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लागली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. परिवहन खात्याकडून उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवण्यासाठी तीनदा मुदतवाढ देण्यात आलेली होती. आता चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेले आहे.

आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही पाटी लावता येणार आहे. त्याचबरोबर राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीची 2 कोटी 54 लाख 90 हजार 159 जुनी वाहने आहेत. त्यातील फक्त 49 लाख 89 हजार 656 एवढ्याच वाहनांना HSRP नंबर प्लेट लागल्या आहेत. येत्या काही दिवसामध्ये पैसे भरून वेळ घेतलेल्या 10 टक्के वाहनांना आणखी HSRP नंबर प्लेट बसवल्या जातील. परंतु 15 ऑगस्टपूर्वी शिल्लक 70 टक्के वाहनांना HSRP नंबर प्लेट कशी बसवली जाईल, हा प्रश्न निर्माण झाला होता.

या योजनेला ग्रामीण भागातून फारच अल्प प्रतिसाद मिळत आहे. कारवाई करण्यात आली की पाट्या बदलण्याच्या मोहीमेला गती मिळेल असे परिवहन विभागाचे निरीक्षण आहे. राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 च्या अगोदर नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी नाही बसवणाऱ्या वाहनांवरती 1 डिसेंबर नंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी सांगितले आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *