आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता फक्त एका कुटुंबातील दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दोनच महिला म्हणजे नक्की याचा अर्थ काय? आपण आज सदर लेखातून जाणून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील दोनच महिलांनाच लाभ देण्यात येणार असतानाही त्या कुटुंबातील तिसऱ्या-चौथ्या महिलांनीही यासाठी अर्ज केलेले आहेत. काहींनी रेशन कार्ड वेगळे आहे असे सांगितले आहे व काहींनी वय 18 वर्ष पूर्ण नसतानाही अठरा पूर्ण झाल्याचे दाखवून अर्ज केलेले आहेत.
परंतु आता एकच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा देण्यात येणार आहे. या निकषांची पडताळणी मतदान झाल्यानंतर सुरु होणार आहे. आत्तापर्यंत दहा लाखापेक्षा जास्त महिलांनी लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. राज्यातून लाडकी बहिणी योजनेसाठी 2 कोटी 57 लाख महिलांनी अर्ज सादर केले होते. त्यामध्ये 18 ते 65 वयोगटातील महिला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या व निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजेच याचा अर्थ असा की, एक विवाहित व एक अविवाहित अशा दोन महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे.
लाभार्थी महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी गाडी नसावी, सदर लाभार्थी महिला ही शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दरमहा रु.1,500/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असल्यास, अशा या योजनेच्या अटी आहेत. तरीसुद्धा एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून, कुटुंबाकडे चारचाकी गाडी नाही असे सांगून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे दाखवून योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ बंद झालेल्या अनेक महिलांना संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केलेले आहेत असे त्यांनी सांगितले आहे.
तक्रार नोंदवण्यासाठी ‘हा’ पर्याय-
लाभ मिळणे बंद झालेल्या लाडक्या बहिणींना तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरती ‘ग्रिवन्स’ हा पर्याय देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ऑफलाइन तक्रार अर्ज करण्यासाठी महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये जावे. त्या ठिकाणची तक्रारींची संख्या 10 लाखांवरती जाऊन पोहचलेली आहे. आतापर्यंत लाभ मिळत होता, परंतु आता अचानक लाभ बंद झाल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचे लाभ देखील आता बंद करण्यात येत आहेत. लाभ बंद झालेल्या महिलांच्या नावापुढे ‘आरटीओ रिजेक्टेड’, ‘आदर स्कीम बेनिफिशियरी, व आता ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा देण्यात येत आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
तक्रार नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

