लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना हप्ता आलेला नाही. त्यातील अनेक अशा महिला आहेत, ज्या सर्व अटी व शर्तीमध्ये बसतात परंतु पात्र असून सुद्धा या महिलांना हप्ता मिळालेला नाही. त्यांनी फक्त एक काम करायचे आहे ते कोणते चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया.
हप्ता मिळत नसेल तर फक्त हे काम करा-
- सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जावे.
- त्यामध्ये सर्वात वरती एक हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक 181 दिलेला आहे. यावरती कॉल करून तक्रार नोंदवायची आहे.
- त्यानंतर “अर्जदार लॉगिन” बटणावरती क्लिक करायचे आहे.
- आता पुढे मोबाईल नंबर, पासवर्ड व कॅप्चा टाकायचा आहे. ज्याचे अकाऊंट यावरती आहे, त्याचा मोबाईल नंबर व पासवर्ड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.
- नंतर तेथील “तक्रार” या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- आता तेथे देण्यात आलेल्या “Add Grievance” या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर तक्रार फॉर्म येणार आहे, त्यामध्ये तक्रार प्रकारमध्ये दोन नंबरचा पर्याय आहे तो निवडायचा आहे व तक्रार श्रेणीमध्ये “OTHER” हा पर्याय निवडायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता पुढे सर्व विचारलेली माहिती भरायची आहे.
- पोर्टलवरून ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हा पर्याय लागू आहे, परंतु ज्यांनी ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेला आहे त्यांना हा पर्याय लागू नाही. त्यांनी हेल्पलाइन नंबरवरती कॉल करावा किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन भेट द्यावी.
- त्यानंतर माहिती सबमिट करावी.
- आता परत तुम्हाला सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- अशा पद्धतीने तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

