आधार कार्डमधील बदलांसाठी आता ‘ही’ कागदपत्रे आवश्यक?

आधार कार्ड हे आता एक महत्त्वपूर्ण दस्तवेज मानले जात आहे. म्हणजेच एक प्रकारे आधार कार्ड हा ओळखीचा पुरावाच ठरला आहे. अनेक कार्यालयीन कामांसाठी त्याचबरोबर सरकारी कामांसाठी आधार कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. आधार कार्ड बाबतीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय यूआयडीएआयने घेतलेला आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु विदेशी नागरिकांसाठी नियम वेगळे असणार आहेत.

जर तुम्हाला नवीन आधार कार्ड बनवायचे असेल किंवा जुन्या आधार कार्डमध्ये नाव, पत्ता किंवा फोटो बदलायचा असेल तर आता तुम्हाला नवीन नियमांची काळजी घ्यावी लागणार आहे. नवीन नियमांच्यानुसार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मार्फ़त 2025-26 साठी आधार अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची नवीन यादी जाहीर केलेली आहे. आता एका व्यक्तीसाठी एकच आधार कार्ड हा नियम राबवण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जर अधिक आधार कार्ड असतील तर सुरुवातीचे आधार कार्ड वैद्य ठरवण्यात येणार आहे व इतर सर्व आधार क्रमांक रद्द करण्यात येणार आहेत.

सदर कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-

  • ओळखपत्र- यामध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड (वैध ई-पॅन कार्ड), मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, शासकीय उपक्रमाने जारी केलेले फोटो आयडी, नरेगा जॉब कार्ड, पेन्शनर ओळखपत्र, केंद्र सरकारची आरोग्य योजना/ माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना कार्ड, ट्रान्सजेंडर ओळखपत्र इत्यादी यातील कोणतेही एक पुरावे म्हणून दाखवू शकता.
  • पत्याचा पुरावा- वीज/पाणी/गॅस/लँडलाईन बिल (तीन महिन्याच्या आतले), बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, भाडे करार (नोंदणीकृत), पेन्शन दस्तऐवज, राज्य/केंद्र सरकारने जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी
  • जन्म दाखला- शाळेची गुणपत्रिका, पासपोर्ट, पेन्शन कागदपत्र ज्यामध्ये तुमची जन्मतारीख लिहिलेली असेल, जन्मतारीख असलेले राज्य किंवा केंद्र सरकारचे प्रमाणपत्र
  • नात्याचा पुरावा- हे आवश्यक असल्यास.

कोणाला लागू होणार नवीन नियम-

भारतीय नागरिक-

  • परदेशात राहणारे भारतीय(एनआरआय)
  • 5 वर्षापेक्षा जास्त वयाची मुले
  • दीर्घ कालावधीसाठी व्हिसावर भारतात राहणारे परदेशी नागरिक

परदेशी व ओसीआय कार्डधारकांना त्यांचा पासपोर्ट, व्हिसा, नागरिकत्व प्रमाणपत्र किंवा एफआरआरओचा रहिवासी परवाना दाखवावा लागणार आहे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *