शिधा वाटप विभागाकडून अनेकदा आवाहन करूनही बहुतेक शिधापत्रिकाधारकांनी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. आता अशा कार्डधारकांची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदतही संपुष्टात आलेली आहे. मुदत उलटून गेली तरीही केवायसी न केलेल्या कार्डधारकांनी ऑनलाईन केवायसी करून घेणे गरजेचे आहे, नाहीतर बोगस रेशनकार्डच्या यादीत त्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट होण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
केवायसी नाही केलेले लाभार्थी ठरणार बोगस-
ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी अजूनही झालेली नाही त्यांना ‘मेरा ई-केवायसी अॅप’ किंवा ‘ई-पॉज मशिन’ च्या माध्य्मातून ई-केवायसी करुन घ्यावी, असे फोनद्वारे संपर्क करून सांगण्यात येते आहे. पण याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिल्यामुळे व केवायसी पूर्ण नाही केल्यास लाभार्थी बोगस ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुदत उलटल्यामुळे आता शासन घेणार निर्णय-
शिधापत्रिकाधारकांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याची शासनाने ठरवून दिलेली मुदत संपलेली आहे. परंतु तरीही ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना ‘ई-पॉज मशिन’ व ‘मेरा ई-केवायसी’ अॅपच्या माध्यमातून ई-केवायसी करता येत आहे. त्यांचा लाभ कार्डधारकांनी वेळेत घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
रेशनच्या धान्याची विक्री केली तर शिधापत्रिका रद्द-
रेशनिंग विभागाकडून वितरित करण्यात आलेले मोफत व सवलतीचे अन्नधान्य संबंधित शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबियांसाठी वापरणे गरजेचे आहे. परंतु ते धान्य दुसरीकडे कोठेही विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करून शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई होणार आहे. सरकारने निश्चित केल्याप्रमाणे शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसीची मुदत संपलेली आहे, परंतु ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी ‘ई-पॉज मशिन’ व ‘मेरा ई-केवायसी’ अॅपच्या माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करावी. संबंधित शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभ वेळेत घ्यावा,असे आवाहन करण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

