आज आपण सदर लेखातून रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्या रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना उद्यापर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी फक्त एकच दिवस उरलेला आहे. जर 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मोफत रेशन धान्य मिळणे बंद होणार आहे. या अगोदर शेवटची तारीख ही 30 मार्च होती. सरकारने आत्तापर्यंत सहा वेळा अंतिम मुदत वाढवलेली आहे. परंतु यावेळी सरकारने असे म्हटले आहे, की कोणत्याही परिस्थितीमध्ये ई-केवायसी प्रक्रिया 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी.
ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण नाही केली तर अशा रेशनकार्ड धारकांची नावे बनावटी युनिट म्हणून वगळली जाणार आहेत. यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची शक्य तितक्या लवकर ई-केवायसी प्रक्रिया करुन घ्यावी. हे काम तुम्हाला मोबाईलवरुनही करता येते. शासनाने बनावटी रेशनकार्डधारकांना सिस्टीम मधून काढून टाकण्यासाठी त्याचबरोबर ही मोहीम शासनाने गरजू लोकांपर्यंत मोफत रेशनचे धान्य पोहोचवण्यासाठी सुरू केलेली आहे.
ई-केवायसी करण्याची पद्धत-
- घरी बसल्या रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन खालील दोन ॲप डाऊनलोड करायचे आहे.
अ) Mera E-KYC Mobile App येथे क्लिक करून डाऊनलोड करा किंवा गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन “Mera E-KYC” सर्च करून हे अॅप डाऊनलोड करा.
ब) Aadhaar Face RD Service App येथे क्लिक करून डाऊनलोड करा किंवा गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन “Aadhaar Face RD” सर्च करून हे अॅप डाऊनलोड करा.
- त्यानंतर दोन्ही ॲप इन्स्टॉल करा व आवश्यक त्या परवानग्या द्या.
- आता Mera E-KYC अॅप उघडा व पुढे दिलेल्या स्टेप फॉलो करा. राज्य- महाराष्ट्र निवडा. आधार क्रमांक टाकावा व आधारशी संलग्न मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकावा. कॅपच्या कोड टाकावा.
- चेहऱ्याद्वारे पडताळणी करण्यासाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करून घ्यावा. स्क्रीनवर दिलेल्या सूचनानुसार डोळ्याची उघडझाक करावी. दुसऱ्या व्यक्तीची ई-केवायसी करण्यासाठी बॅक कॅमेराचा वापर करावा.
- यशस्वी पडताळणी झाली तर लाभार्थ्यांची माहिती रास्त भाव दुकानांच्या ई-पॉस मशीनवर दिसणार आहे. तसेच याची खात्री करण्यासाठी अॅपमध्ये देण्यात आलेल्या “E-KYC Status” या पर्यायावर क्लिक करून तपसावे.जर “E-KYC Status-Y” दिसले तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
त्याचबरोबर तुम्ही तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या वेबसाई वरती जाऊन देखील रेशनकार्ड ई-केवायसी करू शकता. तेथे रेशनकार्डसाठी ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करावे. नंतर त्यामध्ये रेशनकार्ड क्रमांक व कुटुंबप्रमुखाचा आधार कार्ड क्रमांक टाकावा. त्यानंतर मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल, तो टाकावा. ओटीपी टाकल्यानंतर सर्व माहिती एंटर करावी व सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करावे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
ई-केवायसी प्रक्रिया झाली आहे की नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा.