आता घरीबसल्या मोबाईलवरती काढता येणार फार्मर आयडी कार्ड?

राज्यामध्ये सीएससी केंद्रामार्फत शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना धापळ करावी लागत होती. परंतु आता राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांना आता घरीबसल्या स्वतःचा ओळख क्रमांक आपल्या मोबाईलवरती काढता येणार आहे. तशी सुविधा देणारे संकेतस्थळ नुकतेच सुरू झालेले आहे. कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे, की फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी सातबाराधारकाला इकडे-तिकडे फिरण्याची गरज आता राहिलेली नाही.

कारण शेतकऱ्यांना घरीबसल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन आपला फार्मर आयडी कार्ड काढता येणार आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना 15 एप्रिल पासून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केलेले आहे. या अगोदर हा क्रमांक मिळवण्यासाठी सीएससी केंद्रात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आतापर्यंत 94 लाख शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळालेला आहे. अद्यापही वीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी स्वतःचा ओळख क्रमांक काढलेला नाही. फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्याचा स्वतःचा आधार क्रमांक हा बँक खात्याशी संलग्न असलेला मोबाईल नंबर आपल्या जवळ ठेवावा लागणार आहे.

घरी बसल्या मोबाईलवरती फार्मर आयडी कार्ड कसे काढावे-

  • फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या अधिकृत वेबसाईटवरती वरती जावे.
  • तेथील Farmer यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर Create new user येथे क्लिक करावे.
  • नंतर Aadhar E-kyc करायची आहे व Submit या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • पुढे आधार लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरती आलेला OTP टाकवा व Verify या बटनावर क्लिक केले की शेतकऱ्यांची सर्व माहिती दिसेल.
  • त्या ठिकाणी शेतकऱ्याला स्वतःच्या नावे कोठे-कोठे जमीन आहे हे दिसू लागेल. आपल्याला जमिनीच्या चौकटी समोर क्लिक करायचे आहे. समजा स्वतःच्या जमिनीचा तपशील आपोआप आला नाही तर सात-बारावरील गट नंबर टाकला की तपशील आपल्याला पाहता येणार आहे.
  • त्याठिकाणी Agristack Portal ला जो मोबाईल नंबर जोडायच आहे तो टाकावा.
  • त्यानंतर OTP टाकून मोबाईल Verification करायचे आहे व Agristack Profile Password सेट करायचा आहे.
  • आता Set Password व Confirm Password टाकावा.
  • नंतर Create My Account येथे क्लिक करावे.
  • आता रजिस्ट्रेशन होऊन प्रोफाईल तयार होणार आहे. त्यानंतर OK या बटणावर क्लिक करावे.
  • पुढे परत लॉगिन पेज तुमच्यासमोर येणार आहे, तेथील Username मध्ये तुमच्या मोबाईल नंबरने Login करावे.
  • त्यानंतर रजिस्टर As Farmer या ठिकाणी क्लिक करावे.
  • Mobile Confirmation मध्ये (मोबाईल नंबर हा बदलायचा नसल्यास No वरती क्लिक करावे)
  • पुढे Farmer ID Form ओपन होईल.
  • तेथे Farmer Details मध्ये पूर्ण नाव टाकयचे आहे व उर्वरित इतर माहिती व्यवस्थित भरायची आहे.

तीन प्रकारच्या मान्यता द्याव्या लागणार-

संकेतस्थळावरती माहिती भरून झाली की जमिनीचा तपशील आल्यानंतर शेतकऱ्याला तीन प्रकारच्या मान्यता देणे बंधनकारक आहे. एक ‘माझा सात-बारा उतारा नमूद केलेल्या माहितीस जोडावा’, दोन ‘लाभ मिळवण्यासाठी ही माहिती वापरावी’, तीन ‘दिलेली माहिती खरी आहे’ अशा तीन प्रकारच्या मान्यता द्याव्या लागणार आहेत. शेतकऱ्याने मान्यतेसाठी क्लिक केले की पुन्हा ओटीपी येईल तो ओटीपी टाकून पुढे ‘रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली, असाल संदेश संबंधी शेतकऱ्याला आपल्या मोबाईल नंबरवरती यईल. त्यानंतर शेतकऱ्याचे नोंदणीचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने मोबाईल नंबरवरती पीडीएफ फाईल मिळेल.

त्यामध्ये शेतकऱ्यांचा सर्वतपशील असणार आहे. त्यामध्ये ‘एनरोलमेंट नंबर देखील असणार आहे. हा नंबर म्हणजे शेतकऱ्यांचा ओळख क्रमांक असतो. यापुढे शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी एकाच क्रमांकावर ओळखल्या जाणार आहेत. तसेच त्याला सरकारी मदत, अनुदान किंवा पत्रव्यवहारासाठी देखील हा क्रमांक कायमस्वरूपी लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की शेतकऱ्याला यापुढे आधार क्रमांकाइतकाच शेतकरी ओळख क्रमांक महत्त्वाचा असणार आहे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *