देशातील नागरिकांना रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत धान्यांचे वाटप करण्यात येते. आता हे वाटप ऑनलाईन केले जाते. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत रेशन कार्डची ई-केवायसी करणे गरजेचे आहे. या अगोदर 2013 मध्ये देशातील रेशन कार्ड धारकांनी रेशन कार्डची ई-केवायसी केलेली होती. 2013 पासून 10 वर्षाहून अधिक काळ उलटलेला आहे. नियमानुसार दर 5 वर्षांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तुम्ही या डिजिटल युगात घरी बसून देखील ई-केवायसी करू शकता.
ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. घरी बसल्या ई-केवायसी कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून ती पाहू शकता. अनेक रेशन कार्ड धारकांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया ही अगोदरच केलेली आहे. परंतु त्यांची ई-केवायसी झालेली आहे की नाही याबद्दल त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे. चला तर मग सदर लेखातून ई-केवायसी प्रक्रिया झालेली आहे की नाही याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
ई-केवायसी झालेली आहे की नाही पाहण्याची प्रक्रिया-
- सर्वात अगोदर Mera E-KYC Mobile App येथे क्लिक करुन डाऊनलोड करा किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन “Mera E-KYC” सर्च करून हे अॅप डाऊनलोड करा.
- त्यामध्ये ठिकाण टाकावे.
- त्यानंतर आधार क्रमांक,कॅप्चा व ओटीपी टाकावा.
- जर तुमची ई-केवायसी झालेली असेल तर तुम्हाला स्टेटसमध्ये Y असे लिहिलेले दिसेल.
तसेच या व्यतिरिक्त तुम्ही रेशन कार्डची ई-केवायसी ऑफलाईन देखील करू शकता. जर तुमचे मोबाईल अॅप काम करत नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन देखील ई-केवायसी करू शकता. तेथे तुमचा अंगठा किंवा बोटांचा ठसा पीओएस मशीनद्वारे घेतला जातो. तसेच तुमच्या सोबत तुम्हाला आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन जावे लागते. तुमच्या अंगठ्याचा किंवा बोटाचा ठसा घेऊन पडताळनी केली जाते. त्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
घरी बसल्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.