महाराष्ट्र शासनामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म संचन, पीव्हीसी पाईप व जुनी विहिर दुरुस्ती करण्यासाठी अनुदान देण्यात येते. आता यामध्ये बोअरवेल समाविष्ट करण्यात आलेला आहे.
त्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. शासनाच्या वतीने शेतातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध होते. मागील पाच वर्षापासून शासनाच्या वतीने सिंचन विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचन सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा जर अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांनी लाभ घेतला तर याचा सिंचनासाठी त्यांना मोठा फायदा होणार आहे.
सदर योजनेचे निकष-
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जमातीमधील असावा.
- अर्जदाराकडे सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे.
- शेतकऱ्यांचा जमिनीचा सातबरा व आठ-अ हे त्याच्याच नावाने असावा.
- पात्र अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर जमीन असावी.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- अर्जदाराचे आधार कार्ड
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- सातबारा व आठ-अ
- दारिद्र्यरेषेचे कार्ड
- अर्जदाराचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
- पाणी उपलब्धतेचा दाखला (विहिरीसाठी)
- 0.40 हेक्टर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला
- शेतात विहीर नसल्याचा दाखला
- 500 फुटांच्या अंतरावर कुठलीही विहीर नसल्याचा दाखला
- कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र
- संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र
- जागेचा फोटो
- ग्रामसभेचा ठराव आदी कागदपत्रे गरजेची आहेत
- या कागदपत्रांची पूर्तता अर्ज मंजूर झाल्यानंतर करावी लागते.
सदर योजनेचा अर्ज कसा करावा-
- महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
- त्यानंतर त्यातील शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यातील बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा पर्याय ओपन करावा.
- त्यानंतर त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती भरायची आहे व अर्ज सबमिट करायचा आहे.
- तसेच अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा CSC केंद्रावरती संपर्क करावा.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.