पीएम किसान योजनेच्या अर्जाची दुरुस्ती कशी करावी?

शेतकऱ्यांची जर पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी केलेली नोंदणी बाद करण्यात आलेली असेल किंवा होल्डवर ठेवण्यात आलेली असेल तर अशा नोंदणीमध्ये कागदपत्रे अपलोड कशी करावी? त्याचबरोबर अर्जात दुरुस्ती कशी करावी? याबद्दलची माहिती आपण सदर लेखातून जाणून घेऊया.

अशी करावी दुरुस्ती-

  • सर्वात अगोदर पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जावे. त्या ठिकाणी आपल्या नोंदणीची स्थिती चेक करावी लागेल.
  • त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व कॅपच्या कोड टाकायचा आहे.
  • यानंतर व्हेरिफाय या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर आपल्याला आपल्या नोंदणीची स्थिती दिसेल.
  • त्यामध्ये जर आपण योग्यरित्या कागदपत्राची पूर्तता केलेली नसेल तर कागदपत्रे न मिळाल्यामुळे अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात येईल किंवा अर्जात इतर काही त्रुटी असल्याचे सांगितले जाईल.
  • जर यामध्ये कागदपत्राची व्यवस्थित पूर्तता केली नसेल तर 2019  अगोदरच्या फेरफार व जमिनीचा अद्यावत असा सातबारा ज्याची साईज 20 केबीपर्यंत असणे गरजेचे असते, अशा प्रकारची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे.
  • जर समजा हीच कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची असतील तर यासाठी पुन्हा मेन पेजवर जायचे आहे.
  • या ठिकाणी असलेल्या अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फॉर्मर्स या पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यामध्ये कॅपच्या कोड टाकायचा आहे.
  • नंतर मोबाईल नंबर दाखवला जाईल, त्या नंबरवर एक ओटीपी येईल. मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी रकान्यात भरायचा आहे.
  • त्यानंतर गेट आधार ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • पुन्हा आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटोपी पुन्हा रकान्यात भरायचा आहे.
  • सगळ्यात शेवटी सबमिट फॉर ऑथेंटिफिकेशन या पर्यायावर क्लिक करावे.
  • सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती आपल्याला दिसेल.
  • जर या माहितीत आपल्याला काही बदल करायचे असेल, तर ते मेन्शन करायचे आहेत किंवा जमिनीच्या बाबतीत काही अधिक माहिती आपल्याला त्यामध्ये भरायची असेल तर ते देखील करता येते.
  • परंतु आपण सध्या फक्त कागदपत्रे अपलोड कशी करावी हे पाहणार आहोत.
  • विंडोवर दाखवलेल्या माहितीच्या शेवटी कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे.
  • यामध्ये फाईल निवडा या पर्यावर क्लिक करून आपण संबंधित कागदपत्रांची फाईल या ठिकाणी निवडायची आहे.
  • त्यानंतर शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करावे.
  • सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज पुन्हा एकदा सादर झाल्याचे नोटिफिकेशन आपल्याला येईल.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *