केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन योजनेच्या माध्यमातून नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेत शेतीपूरक प्रकल्पांना दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत(50 टक्के) अनुदान देण्यात येते. त्यामुळे ही योजना शेतकरी व पशुपालकांसाठी वरदान ठरणारी आहे. यामध्ये कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास, मुरघास निर्मिती, वैरण बियाणे उत्पादन आदी प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला आहे.
पशुसंवर्धन उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय प्रशिक्षण अभियान योजनेच्या माध्यमातून शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियांनांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फ़ॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांसाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
प्रकल्पासाठी 10% स्व:हिस्सा व्यक्तिरिक्त उर्वरित 40 टक्के निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून घ्यायचा आहे. या योजनेचा लाभ शेतकरी व्यक्तिगत किंवा गटाद्वारे तसेच स्वयं सहायता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, सहकारी संस्था, खासगी संस्था, स्टार्टअप ग्रुप आदींना घेता येतो. त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
रोजगार निर्मितीची संधी-
शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या पशुपालन व वैरण निर्मिती या कल्याणकारी योजनेद्वारे स्वतःच्या उत्पन्नवाढीबरोबर अंडी, मांस, दूध, लोकर इत्यादी व्यवसायातून इतरांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.
सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- शेत जमिनीचा सातबारा किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीचे कागदपत्र
- बँक खाते पासबुक
- रहिवासी पुरावा
- अनुभव प्रमाणपत्र
- प्रशिक्षण प्रमाणपत्र तर नोंदणीकृत कंपनीसाठी जीएसटी नोंदणी
- लेखामेळ आणि आयकर रिटर्न असणे गरजेचे आहे.
सदर योजनेच्या माध्यमातून दोन टप्प्यात मिळते अनुदान-
या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान एकूण अनुदानाच्या 50 टक्के प्रमाणे दोन टप्प्यात देण्यात येते. अनुदानाचा पहिला टप्पा हा केंद्र शासनाने प्रकल्प मंजूर केल्यानंतर प्रकल्पाचे बांधकाम सुरू करून जिल्हा समितीच्या तपासणी अहवालानंतर देण्यात येते. तर दुसरा व अंतिम टप्पा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो.
सदर योजनेचे असे भेटते अनुदान-
- शेळी-मेंढी पालनासाठी- 10 ते 50 लाख
- कुक्कुटपालनासाठी- 25 लाख
- वराह पालनासाठी- 15 ते 30 लाख
- पशुखाद्य व वैरण निर्मितीसाठी- 50 लाख
सदर योजनेसाठी खालील संस्थांना अर्ज करता येतो-
- कोणतीही व्यक्ती
- शेतकरी उत्पादक संस्था(एफपीओ)
- बचत गट(एसएचजी)
- शेतकरी सहकारी संस्था(एफसीओ)
- संयुक्त दायित्व गट(जेएलजी)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 3 ते 5 एकर शेती असलेल्या युवकांना प्रकल्प किमतीच्या केवळ 10 टक्के रक्कम गुंतवून व्यवसाय सुरू करता येतो. तसेच यासाठी तब्बल 50 टक्के अनुदान देण्यात येते. यासाठी योजनेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येते. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.