आता कुठेही जमीन खरेदी केली; तरी दस्त होणार तुम्हाला पाहिजे असेल त्या दुय्यम निबंधक कार्यालयात!

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा राज्यामध्ये ‘एक राज्य एक नोंदणी’ हा उपक्रम प्रयोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. हा उपक्रम एका ठिकाणचा दस्त अन्न कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता यावा यासाठी सुरू करण्यात आला आहे. आता त्यानंतर 1 एप्रिल पासून पुणे व ठाणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण 48 दुय्यम निबंधक केंद्रामध्ये जिल्ह्यातील कोणत्याही गावातील दस्त नोंद करता येणार आहे. राज्यात सध्या एका जिल्हा सहनिबंध कार्यालयाच्या भागात असलेल्या खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणी त्याच सहनिबंधक कार्यालयात केली जाते.

अनेकदा बाहेरील जिल्ह्यातील खरेदीदार दुसऱ्या जिल्ह्यात जमीन खरेदी करतात किंवा घर खरेदीचे व्यवहार करतात. अशांना संबंधित जिल्हा निबंध कार्यालयात जाऊन व्यवहार पूर्ण करावे लागतात. यातून मार्ग काढण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘एक राज्य एक नोंदणी’ हा उपक्रम राबवण्याचा ठरवलेला आहे. हा उपक्रम प्रयोगिक तत्त्वावर 17 फेब्रुवारीपासून मुंबई व उपनगर या दोन जिल्ह्यांमधील 32 उपनिबंधक कार्यालयात एकत्रितरित्या जोडण्यात आली असून, मुंबईतील खरेदीदारांना या कार्यालयामध्ये कोठेही दस्त नोंदणी करता येणार आहे.

हा उपक्रम राज्यात टप्याटप्याने राबवण्यात येत असून, 1 एप्रिल पासून पुणे व ठाणे जिल्ह्यात हा राबविण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी दिलेली आहे. आर्थिक वर्ष संपत आल्यामुळे मार्चअखेरपर्यंत दस्त नोंदणीची संख्या ही जास्त असते. तसेच यंदा रेडिरेकनर दरात वाढ होण्याचे संकेत देखील असल्यामुळे दस्तांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे राज्यातही हा उपक्रम लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या उपक्रमामुळे वेळेची बचत होईल असे पुणे शहर सहनिबंध संतोष हिंगने यांनी सांगितले आहे.

48 कार्यालये सलग्नित-

पुणे शहरात 27 दुय्यम निबंध कार्यालये आहेत. तर जिल्ह्यात 21 कार्यालयांमधून दस्त नोंदणीही केली जाते. या सर्व 48 कार्यालयांचे एकत्रिकरण केले जाणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील खरेदीदारांनी बारामती तालुक्यातील जमीन खरेदी केली तर त्याला दस्त नोंदीसाठी तेथील कार्यालयात न जाता पुण्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील एखाद्याने पुणे शहरात घर खरेदी केल्यास त्याला पुणे शहरात न येताही दस्त नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा सहनिबंध प्रवीण देशपांडे यांनी दिलेले आहे. लवकरच राज्यात हा उपक्रम सुरु करण्यात येणारे आहे. दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी आय सरिता 1.9 या प्रणालीच्या माध्यमातून ‘एक राज्य एक नोंदणी’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.  

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेयर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *