नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला की नाही? मोबाईलवर कसे पहावे!

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे सुमारे नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे राज्यातील 93.26 शेतकऱ्यांच्या डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये दि. 31 मार्च 2025 पर्यंत जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी सुमारे रु. 2161 कोटी रक्कमेचे वितरण करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना माहे फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केलेली आहे. या योजनेच्या निर्देशानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2000 रुपये प्रति हप्ता यानुसार तीन समान हफ्त्यात प्रतिवर्षी 6000 रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बँकेत जमा झाला आहे की नाही? हे आता मोबाईलवर चेक करता येते. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हप्त्याचे स्टेटस कसे चेक करावे?-

  • सर्वात अगोदर nsmny.mahait.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे.
  • हे स्टेटस नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबरद्वारे देखील पाहू शकता येते.
  • जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहिती नसेल किंवा विसरला असेल तर बाजूला दिलेल्या Know Your Registration No. या पर्यायावर क्लिक करावे.
  • यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकू शकता. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
  • मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी व वर दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकावा.
  • यानंतर Get Data या बटणावर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपल्या समोर शेतकऱ्याचे नाव, त्याचा नोंदणी क्रमांक दिसेल.
  • नंतर मुख्य मेनूमध्ये जाऊन आपल्याला मिळालेल्या नोंदणी क्रमांकाने किंवा मोबाईल नंबरने Beneficiary Status पाहू शकता.
  • त्यानंतर परत एकदा मोबाईल नंबर टाकून ओटीपी मागवायचा आहे. ओटीपी व कॅप्चा कोड टाकून गेट डेटा या पर्यायावर क्लिक करावे.
  • आता आपल्या समोर शेतकऱ्याची सर्व माहिती उपलब्ध होईल. त्यामध्ये नाव, पत्ता याअगोदरचे हप्ते आलेले आहेत का? जर नसतील आले तर का आले नाहीत? याची सर्व माहिती दिसेल.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *