दस्ताऐवज हे शेतजमीन खरेदी-विक्री त्याचबरोबर रियल इस्टेट व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तसेच जर यातील त्रुटी तत्काळ दुरुस्त न केल्यास दस्ताऐवजांच्या कायदेशीरतेला आव्हान देता येते. दुरुस्ती विलेख खरेदीदार व विक्रेत्यांना मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये अशा त्रुटी दूर करण्यासाठी सुविधा देतो. यामध्ये प्राधान्याने शब्दलेखन चुका, टायपिंग चुका, पुनरावृत्ती, संख्यात्मक चुका व जटिल वाक्यरचना यामध्ये दुरुस्त केले जाताते. दुरुस्ती विलेख करण्यासाठी मूळ मालकाच्या तपशीलासह दुरुस्ती विलेखांमध्ये व्यवहारात सहभागी असलेल्या पक्षाची माहिती त्यामध्ये समाविष्ट केलेली असावी.
दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेल्या त्रुटी देखील त्यामध्ये नमूद केलेल्या असणे गरजेचे आहे. याशिवाय विक्री कराराच्या मूळ स्वरूप व वर्णनात कोणतेही बदल केले गेले नाही, असे दोन्ही पक्षांना हमीपत्र देणे देखील गरजेचे आहे. दुरुस्ती विलेखाची नोंदणी करण्यासाठी विलेखांमध्ये सामील झालेल्या दोन्ही पक्षांनी प्रस्ताव बदलावर सहमत असणे गरजेचे आहे. मागील मालकांचे निधन झाले असेल तर काही चुका दुरुस्ती ठरतो. जर कोणत्याही पक्षाला विक्री करारामध्ये त्रुटी आढळून आल्यास जेथे विलेख नोंदणीकृत आहे त्या उपनिबंधक कार्यालयातील व्यक्तीसह हजर राहणे बंधनकारक आहे. सर्व सहायक दस्ताऐवजांबरोबर त्यांना दस्तऐवजात दुरुस्त्या करण्यासाठी अधिकाऱ्याकडे अर्ज करणे गरजेचे आहे. मूळ दस्तऐवजात मोठे बदल आवश्यक असल्यास दोन्ही पक्षांना दोन साक्षीदार देणे बंधनकारक आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

