शासनाने शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या विकासासाठी तसेच सरकारी योजनांचा सहज लाभ घेता यावा यासाठी ‘अॅग्रिस्टॅकच्या’ माध्यमतून शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाते व शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळण्यास मदत होते. अॅग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची फार्मर आयडी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी यादी अशी पहा-
- फार्मर आयडी यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटर/आपले सरकार सेवा केंद्रमध्ये भेट द्यावी व यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे पाहावे.
- CSC सेंटर चालकांनी खाली दिलेल्या लिंकला भेट द्यावी. https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
- वेबसाईट ओपन झाली की तीन ऑप्शन दिसतील. त्यातील Login with CSC या पर्यावर क्लिक करायचे आहे. CSC आयडी व पासवर्डने लॉगिन करायचे आहे.
ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी यादी डाऊनलोड कशी करावी?-
- लॉगिन केल्यावरती Report मध्ये Buckets Claimed Report या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्यात पुढे तुमचा जिल्हा, तालुका व गावाचे नाव निवडून Export Excel या ठिकाणी क्लिक करायचे आहे.
- नंतर तुमच्यासमोर अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी यादीची फाईल डाऊनलोड होईल. त्यामध्ये तुमचे नाव शोधायचे आहे.
- अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी आपण ग्रामपंचायत कार्यालय, CSC सेंटर(कॉमन सर्व्हिस सेंटर), आपले सरकार सेवा केंद्र व तलाठी कार्यालयमध्ये देखील जाऊन पाहू शकता.
- अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी यादीमध्ये आपले नाव नसेल तर अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी स्टेटस ऑनलाईन घरी बसल्या चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

