महाराष्ट्र शासनाने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केलेली आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 आहे. जर ही प्रक्रिया 31 मार्च 2025 च्या अगोदर पूर्ण केली नाही तर त्या लाभार्थ्यास अनुदानित अन्नधान्य मिळणे बंद होऊ शकते. तसेच ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांची शिधापत्रिकेतून नावे देखील वगळली जाणार आहेत.
ई-केवायसी प्रक्रिया करणे का गरजेचे-
शिधापत्रिकेवरील नावे योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करणे गरजेचे आहे. शासनाने 31 मार्च मुदत ही शेवटची दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना या अगोदरच राज्य सरकारला दिलेल्या होत्या.
त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांनी ई-केवायसी मोहीम हाती घेऊन ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ही प्रक्रिया मोठी असल्यामुळे यासाठी या अगोदर अनेक वेळा मुदतवाढ देखील देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची रेशन कार्ड ई-केवायसी प्रक्रिया राहिलेली आहे, त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

