विहीर अनुदान योजना 2025

आज आपण सदर लेखातून जुन्या व नवीन विहिरीची कामे करणाऱ्या बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाद्वारे अनुसूचित अनुसूचित जाती-जमातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्याला नवीन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते.

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला विहिर खोदल्या जात आहेत. तसेच ही योजना अनुसूचित जाती, नवबोद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी स्वावलंबन योजना राबवण्यात येते. ही योजना जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबवली जाते.लाभार्थ्यांसाठी अनुदान हे समाज कल्याण विभागामार्फत दिले जाते. या योजनेतून बऱ्याच विहिरी खोदल्या जात असल्याचे विभागाच्या मार्फत सांगण्यात आलेले आहे.

विहिरींची कामे उन्हाळ्यातच का केली जातात?-

पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे विहिरीचे काम करता येत नाही. त्यामुळे विहिरींची कामे ही उन्हाळ्यात केली जातात. तसेच उन्हाळ्यात शेतकऱ्यांना इतर शेतीची कामे कमी असतात व त्यामुळे शेतकऱ्याला अन्य कामांच्या व्यापातून वेळ मिळतो.

निवड समिती कोण?-

लाभार्थी निवडीसाठीची समिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असते. यामध्ये सहा सदस्य कार्यरत करण्यात आलेले असतात.

एका लाभार्थ्याला किती अनुदान-

या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजार, बोरिंगसाठी 20 हजार रुपये, कृषी पंपासाठी 20 हजार रुपये, वीज जोडणीसाठी 10 हजार रुपये, शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एक लाख रुपये, ठिबक सिंचनासाठी 50 हजार रुपये, तुषार सिंचनासाठी 25 हजार रुपये या प्रमाणे अनुदान देण्यात येते.

सदर योजनेची पात्रता-

  • या योजनेच्या लाभ घेणारा शेतकरी नवबौद्ध, अनुसूचित जातीमधील असावा.
  • कमीत कमी एकर जमीन असणारा शेतकरी नवीन विहिरीच्या लाभासाठी पात्र असणार आहे.
  • विहिरीव्यतिरिक्त इतर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी 20 गुंठे जमीन असावी.
  • या योजनेच्या लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे.
  • सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
  • सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • वार्षिक उत्पनाचा दाखला

सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क-

कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समितीकृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *