पीएम किसान योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मागील हप्ते ही मिळणार!

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना जोडण्याची मोहीम शासन सुरू करणार आहे. या योजनेमध्ये लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे, परंतु अनेक शेतकरी आजही काही त्रुटींमुळे या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सरकार सुवर्णसंधी देणार आहे. जे शेतकरी पात्र आहेत परंतु अजूनही या योजनेमध्ये सहभागी झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना त्यांचे मागे हफ्ते मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी नव्याने योजनेत सामील होऊन लाभ घेता येणार आहे.

सदर योजनेचा लाभ कसा मिळवावा-

जर तुम्ही शेतकरी असाल व अजूनही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत सहभागी झाले नसाल तर सरकारने तुम्हाला आणखी एक संधी दिली आहे. शासन 15 एप्रिल 2025 पासून चौथी मोहीम सुरू करणार आहे. त्यामध्ये नवीन पात्र शेतकरी जोडले जातील. परंतु नवीन शेतकऱ्यांना नोंदणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शासनाने यासाठी काही अटी देखील घातलेले आहे.

सदर योजनेच्या अटी-

  • या योजनेच्या लाभास पात्र होण्यासाठी शेतकऱ्याकडे शेती योग्य जमीन असणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे देखील गरजेचे आहे.
  • पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे.
  • या तीन अटी पूर्ण केल्यावर शेतकरी या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो.

सदर योजनेचा अर्ज कसा करावा-

  • सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर पीएम किसान पोर्टलच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जावे.
  • त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाकावा व ओटीपीद्वारे पडताळणी करावी.
  • सर्व आवश्यक माहिती भरावी व अर्ज हा सबमिट करावा.
  • काही दिवसांमध्ये तुमच्या अर्जाची स्थिती निश्चित करण्यात येईल.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *