महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळवण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत अशी महत्त्वाची योजना आहे. ई-पीक पाहणी कार्यक्रमाच्या माध्यमातून रब्बी हंगाम 2024-25 साठी शेतकरी स्तरावरील नोंदणीची अंतिम तारीख ही 15 जानेवारी 2025 होती. त्यानंतर, सहाय्यक स्तरावरील नोंदणी 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान करण्यात आलेली आहे. रब्बी हंगाम 2024-25 साठी शेतकरी स्तरावरील स्वतः आपण केलेली ई-पीक पाहणी किंवा त्याचबरोबर सहाय्यक स्तरावरील झालेली ई-पीक पाहणी झाली आहे की नाही? हे पाहण्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. ते कसे पाहावे, आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत.
ई-पीक पाहणी झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करावे?-
- सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावे. https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
- त्यानंतर ते अॅप ओपन करून सगळ्या परमिशन Allow कराव्यात.
- पुढे तुमच्या महसूल विभागाची निवड करायची आहे व खालील बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर लॉगिन पद्धत निवडायची आहे. त्यामध्ये शेतकरी म्हणून वर क्लिक करायचे आहे.
- आता पुढे त्यामध्ये मोबाईल नंबर टाकावा. तुम्ही जर तुमचे खाते जोडले असेल तर खाते नंबर देखील निवडावा. (जर खाते नंबर जोडला नसेल तर सर्व माहिती भरून तो जोडावा.)
- खाते नंबर निवडल्यानंतर 4 अंकी संकेतांक नंबर त्यामध्ये टाकावा. (जर संकेतांक नंबर विसरला असाल तर खाली संकेतांक विसरलात? यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा 4 अंकी संकेतांक नंबर दिसेल, तो तुम्ही वरती टाकावा.)
- संकेतांक नंबर टाकून झाल्यानंतर खालील बटणावर क्लिक केल्यानंतर पुढे गेल्यावर एकूण 6 पर्याय तुमच्यासमोर येतील.
- या पर्यायांमधील शेवटचा पर्याय गावाचे खातेदारांची पीक पहाणी हा पर्याय निवडावा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व खातेदारांची नावे दिसतील, यामध्ये तुमचे नाव शोधून त्यापुढे डोळ्यासारख्या दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक करा. तुमची पिक पाहणी झाली आहे की नाही हे तुम्हाला समजेल.
नोट-
- ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी स्वतःच्या मोबाईलद्वारे केलेले आहे त्यांना हे पाहणे सोपे जाणार आहे. ज्यांना नवीन नोंदणी करून पहायचे असेल, त्यांना सर्व माहिती भरून नोंदणी करून ती पहावी लागणार आहे.
- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

