महायुती सरकारने सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये केले जातील असे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढले जातील, असे म्हटले जात होते. परंतु अद्याप अशा प्रकारची सरकारने कसलीही घोषणा केलेली नाही. अशी परिस्थिती असताना आता शेतकरी महिलांच्या अकाउंटवर 1500 ऐवजी केवळ 500 रुपये आलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवणाऱ्या विभागाकडून शेतकरी लाभार्थी महिलांच्या खात्यावरती 8 मार्चला फेब्रुवारी महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले. परंतु काही शेतकरी महिलांना 1500 रुपये ऐवजी 500 रुपये मिळाले. त्यामुळे पात्र शेतकरी लाभार्थी महिलांचे 1000 हजार रुपये कोठे गेले? असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया .
कोणत्या शेतकरी महिलांना 500 रुपये जमा झालेले आहेत-
ज्या शेतकरी महिला पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत, तसेच ज्या महिला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना प्रत्येक महिन्याला शासन 500 रुपये देणार आहे. ज्या महिला पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना 500 रुपये देण्याची घोषणा शासनाने या अगोदरच केली होती.
थोडक्यात जाणून घेऊया पैसे कसे मिळतात-
- लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वर्षाला 18 हजार रुपये मिळतात.
- पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वर्षाला 12 हजार रुपये मिळतात. या दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला प्रत्येक महिन्याचे 500 रुपये म्हणजेच वर्षाचे 6000 हजार रुपये मिळतील. म्हणजेच एकूण 12000+6000= 18000 रुपये या महिलांना मिळणार आहेत.
- यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचा बँक खात्यामध्ये 500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

