आपले सरकार हे देशातील शेतकरी व ग्रामस्थांना मदत करण्यासाठी सतत नवीन योजना राबवत असते. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजेच “प्रधानमंत्री सूर्यघर योजना”. ही योजना सौर ऊर्जेचा वापर वाढवा या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. परंतु या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यासाठी नेमकी कुठे व कशी तक्रार करावी याबद्दलची सदर लेखात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार सौर पॅनल बसवण्यासाठी 40% पर्यंत अनुदान देते. तसेच ही योजना वीज बिल कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार लोकांना त्यांच्या घरात सौर पॅनल बसवण्यास प्रोत्साहित करते व त्यासाठी अनुदान देखील देते. त्याचबरोबर या योजनेमध्ये सहभागी झाल्यावर दरमहा 300 युनिट मोफत वीज देखील मिळते. त्यामुळे घरांमध्ये विजेचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच सौर पॅनल बसवल्याने पर्यावरणालाही फायदा होतो. कारण ते एक स्वच्छ व हरित ऊर्जा स्रोत आहे.
काय अडचण आहे-
या योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना सौर पॅनल बसवले आहेत. परंतु तरीही त्यांना अनुदान मिळाले नाही. अशा परिस्थितीत लोकांना अडचणी येत आहेत. काही लोकांनी असे म्हटले आहे की संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनही सबसिडीचे पैसे त्यांच्या खात्यात आलेले नाहीत.
अनुदान मिळाले नाही तर काय करावे?-
जर तुम्ही पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सौर पॅनल बसवले असतील, परंतु तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळाला नसेल, तर तुम्ही याबद्दल तक्रार दाखल करू शकता.
टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा-
याबद्दलची तक्रार करण्यासाठी तुम्ही नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या 1800-180-3333 या टोल फ्री क्रमांकवर कॉल करू शकता. या योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी हा क्रमांक तुम्हाला मदत करणार आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट द्या-
तसेच, तुम्ही प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या pmsgg.in या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. वेबसाईटवर तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या समस्यांचे तपशील व सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

