पीएम सूर्यघर योजना माहिती 2024

आज आपण सदर लेखातून पीएम सूर्य घर योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवली जात आहे. आज आपण सदर लेखातून या योजनेचा अर्ज कसा करावा, सबसिडी किती दिली जाते व कागदपत्रे कोणती याची माहिती जाणून घेणार आहोत.

सदर योजनेची माहिती-

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केले तेव्हा पीएम सूर्य घर योजनेची अधिक माहिती मिळाली. जे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले होते तेच अर्थमंत्री यांनी देखील सांगितले.
  • फक्त त्यांनी या योजनेचे नाव पीएम सूर्योदय योजने ऐवजी पीएम सूर्य घर- मोफत वीज योजना असे सांगितले.
  • या योजनेच्या माध्यमातून देशभरातील 1 कोटी घरांवर रुफ टॉप सोलर सिस्टम बसवण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 300 युनिट पर्यंत वीज पुरवठा केला जातो.
  • यामुळे लोकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल.या योजननेचा लाभ देशातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दिला जाणार आहे. तसेच यासाठी सुमारे 60% अनुदान दिले जाणार आहे.
  • सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण सोलर पॅनल बसवल्यानंतर दरमहा कमाई करू शकणार आहात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कारण जर तुम्ही तुमच्या घरावर सौर पॅनल लावले असतील.
  • तुम्ही त्यातून सुमारे 300 युनिट वीज तयार करत असाल व तुम्ही त्यातली फक्त 150 युनिट वीज वापरत असाल. तर जी उर्वरित वीज राहील ती तुम्ही सरकारी कंपन्यांना दर महिन्याला विकू शकता. त्यातून तुमची वार्षिक कमाई 15 ते 20 हजार रुपये होऊ शकते.

सदर योजनेचे अनुदान-

सरासरी मासिक विज वापर(Units)रुफ टॉप सोलर सिस्टम क्षमता         अनुदान
      0-150       1-2 kwRs.30,000/- to     Rs.60,000/-
     150-300       2-3 kwRs.60,000/- to Rs.78,000/-
     >300     Above 3 kwRs.78,000/-

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • विज बिल
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • राहते घर स्वतःचे असल्याचा ग्रामपंचायत पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला 
  • स्वयंघोषणा प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

सदर योजनेची अधिकृत वेबसाईट-

या योजनेचा अर्ज करण्यासाठी pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

सदर योजनेची अर्ज करण्याची पद्धत-

  • सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • नंतर Rooftop Solar Scheme या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे राज्य निवडा. तुमची वीज वितरण कंपनी निवडा. तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाका. मोबाईल नंबर टाका. ई-मेल प्रविष्ट करा. कृपया पोर्टलच्या निर्देशानुसार अनुसरण करा.
  • ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगिन करा. फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
  • DISCOM कडून मंजुरीची प्रतीक्षा करा. जेव्हा मंजूरी मिळेल तेव्हा तुमच्या डिस्कॉममधील नोंदणीकृत विक्रेत्यांद्वारे प्लांट स्थापित करावा लागेल.
  • इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर, प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा.
  • नेट मीटर बसवूण झाल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी करुन झाल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
  • तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर पोर्टलच्या माध्यमातून बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा. सबसिडी तुमच्या खात्यात कामकाजाच्या 30 दिवसात येईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *