पीएम किसान सन्मान निधी योजनेत प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला 6,000/- रुपये देण्यात येतात. हे पैसे शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्यांमध्ये 2,000/- रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 4 महिन्याचे अंतर असते. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 15 हप्ते दिले आहेत. या योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्याद्वारे 28 फेब्रुवारी 2024 रोजी पाठवला जाणार आहे.
सदर योजनेच्या लाभासाठी ही कामे आवश्यक पूर्ण करा-
- ई-केवायसी केलेले आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे.
- तसेच आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही हे पाहणे देखील गरजेचे आहे.
सदर योजनेच्या हप्त्याची स्थिती कशी तपासावी-
- सर्वात अगोदर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- नंतर Know Your Status वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक भरायचा आहे.
- नंतर स्क्रीनवर दाखवलेला Captcha Code टाका.
- आता सर्व माहिती भरून Get Details वरती क्लिक करा.
- एवढे झाले की तुम्हाला स्क्रीनवर स्टेटस दिसेल.
नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now