सरकार अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिला अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. मग ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे परत घेणार आहे का सरकार; त्या संदर्भातील शासनाने स्पष्ट माहिती दिली आहे. चला तर मग सदर लेखातून थोडक्यात जाणून घेऊया याबद्दलची माहिती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासनातर्फे महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात या अगोदर जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

तसेच त्यांनी स्पष्ट देखील केले की पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबुद्ध असल्याचे आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै 2024 ते डिसेंबर 2024) पर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे देखील विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलेले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये सन्मान निधी प्रदान करण्यात येतो. परंतु योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली. या योजनेच्या माध्यमातून पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्माननिधी परत घेण्यात येणार नसून, अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र असणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळले जात आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *