लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहे. अशातच राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार का? असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला आहे. अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे. परंतु अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत तसेच शासनाने कुठलाही लाभ परत घेतला नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर आदिती तटकरे यांनी ट्विट करत 28 जून व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे असे म्हटले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो.
तसेच लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. महिन्याभरात लाभार्थी महिलांची संख्या 5 लाखांनी घटली असल्याची बातमी समोर आलेली आहे. डिसेंबर 2024 मध्ये 2 कोटी 46 लाख लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळाला होता. तर जानेवारीमधला हप्ता वितरित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 41 इतकी होती. म्हणजेच लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये 5 लाखांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी महिला कश्यामुळे कमी झाल्या, चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या बद्दलची माहिती.
लाडक्या बहिणींची संख्या का कमी झाली?-
लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकीच एक कारण म्हणजे ज्या लाभार्थी महिलांचे वय 65 वर्षाहून अधिक होते, त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देण्यात येतो. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे. म्हणजे सरकारी योजनेच्या माध्यमातून दुहेरी योजनांच्यामार्फत आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे अशा लाभार्थी महिलांना लाडकी बहिणी योजनेतून वगळण्यात आले आहे.
आदिती तटकरे यांचे ट्विट काय-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना!
दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी प्रसारीत करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र असणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी” योजनेतून वगळले जात आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे-
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या महिला- 2,30,000
- वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला- 1,10,000
- कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला- 1,60,000
- एकूण अपात्र महिला- 5,00,000
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.