राज्यामध्ये शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी 8863 शाळांमधील 1 लाख 9 हजार 111 जागांसाठी तब्बल 35 हजार 828 अर्ज आलेले आहेत. सोमवारी (ता.10) रोजी या पालकांची उत्सुकता आता संपणार आहे. कारण प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईन माध्यमातून प्रवेशाची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात दरवर्षी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 नुसार 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी पुणे जिल्ह्यातील 960 शाळांमधील 18,507 जागांसाठी सर्वाधिक सुमारे 61 हजार 687 अर्ज सादर करण्यात आलेले आहेत.
महत्त्वाचे मुद्दे-
प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाईन सोडती सोमवारी (ता.10) जाहीर झाल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये म्हणजेच साधारणत: 14 ते 15 फेब्रुवारी दरम्यान पालकांना बालकाच्या प्रवेशाचा संदेश अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर येईल. त्यानंतरच बालकांच्या शाळा प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.