पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करून 50 हजार रुपयांवरून ते आता 1 लाख रुपये करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. शासनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वकांशी मोहीम हाती घेतलेली आहे. त्यानुसार राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
तसेच या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेच्या अभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहतात. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेच्या माध्यमातून घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयापर्यंत अर्थसाह्य उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकरणामुळे सद्यस्थितीमध्ये जागांच्या किंमतीचा विचार करता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून घरकुल बांधण्यासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी दिले जाणारे अनुदान आता 1 लाख रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
घरकुलाची मंजूर यादी ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात लागणार-
अनेकदा आपले नाव घरकुल योजनेच्या यादीत आहे किंवा नाही यासंदर्भातील लाभार्थ्यांना संभ्रम निर्माण होत असतो. अशावेळी ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागांमध्ये आता यापुढे घरकुल योजनेच्या मंजूर लाभार्थ्यांची यादी लावली जाणार आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करताना अनुदान रकमेचा हप्ता वेळेवर मिळ ण्यास मदत होईल व यामुळे घरकुल योजनेच्या माध्यमातून घराचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहे.
सदर योजनेच्या माध्यमातून जागेची उपलब्धता-
या योजनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय/संपादित जागा, ग्रामपंचायतच्या गावठान हद्दीत येणारी जागा व गावठाण हद्दीबाहेरील निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजूरी दिलेल्या जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात.
सदर योजनेचा अर्ज कोठे करावा-
सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी सरपंच/ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करावा.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.