फार्मर आयडी कार्डमध्ये दुरुस्तीचा पर्याय नाही; त्यामुळे फॉर्म भरताना या चुका टाळा.

शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविण्यासाठी, शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचे नाव व क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरणात सुलभता यावी, यासाठी व विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी फार्मर आयडी कार्ड बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु सदर पोर्टलवर एडिटचा पर्याय नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नावे चुकीची व अपुऱ्या माहितीची नोंद झाल्याचे दिसून येत आहे.

महसूल विभागाच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्ड बनवण्यासाठी शहरापासून गाव पातळीवरही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर तसेच सेतू केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे. परंतु नेटवर्क समस्या व सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे नोंदणी करण्यासाठी अनेक ठिकाणी नोंदणी अडचणी येत आहेत.

काय चुका होत आहेत?-

ज्या शेतकऱ्यांची विविध ठिकाणी शेतजमीन आहेत ते शेतकरी फक्त रहिवासी असलेल्या गावातील शेतीचीच नोंदणी करीत आहेत. तसेच महिला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सर्वाधिक चुका पाहायला मिळत आहे. महिलांच्या नावे आई-वडिलांच्या शेतीतील वाटा असतो. याशिवाय मामाच्या शेतीच्या सातबाऱ्यावरही नाव असते. त्यांना तेथील सर्व्हे नंबर नोंदविण्यास लक्षात राहत नाही. सदर चुका दुरुस्ती करण्यासाठी एडिटचा पर्याय असणे गरजेचे आहे. परंतु ही सोय पोर्टलच्या माध्यमातून सध्या तरी ऑनलाईन उपलब्ध नाही.

सध्या अनेक शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी सीएसटी केंद्रावर जातात. तर दुसरीकडे पोर्टलवर सर्व्हर डाऊनच्या प्रॉब्लेममुळे अडथळा येत आहे. तसेच फार्मर आयडी काढताना शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती द्यावी. ज्यामुळे अर्ज सोयीस्कररित्या भरला जाईल. एखाद्या चुकीमुळे अर्ज पुन्हा भरण्याची गरज भासू शकते. परंतु अद्यापही फार्मर आयडी पोर्टलवर दुरुस्तीचा पर्याय देण्यात आलेला नाही.

शेतकरी नोंदणी आहे मोफत-

फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड, आधार संलग्न मोबाईल क्रमांक, शेतकऱ्याचे सर्व सातबारा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच विशेष म्हणजे ही नोंदणी मोफत आहे. सीएससी केंद्रांना नोंदणीचा मोबदला म्हणून प्रति शेतकरी 15 रुपये देण्यात येणार आहेत. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यकांकडे नोंदणीची सोयकरण्यात आलेली आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत राहणार आहे. तसेच कर्ज वितरण सुलभ होणार आहे. पिकविमा, हमीभाव खरेदीचा लाभ  त्याचबरोबर कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील अर्ज करता येणार आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *