महावितरणच्या माध्यमातून ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी राज्यात ‘लकी डिजिटल ग्राहक’ ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या वीज ग्राहकांनी 31 मार्च 2024 नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरणा केलेला आहे, असे सर्व वीज ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच 1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये सलग तीन किंवा तीन पेक्षाजास्त वेळा वीजबिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
ग्राहकांना लकी ड्रॉमार्फत स्मार्टफोन, स्मार्टवॉच सारखी आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरणा करुन लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण केले आहे. तसेच ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशाची बचत करीत डिजिटल पद्धतीने विज बिल भरण्यास प्राधान्य देत आहेत असे निदर्शनास आले आहे. महावितरणाकडून ग्राहकांना डिजिटल पद्धतीने भरणा करता यावा यासाठी अधिकृत संकेतस्थळ व महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
ग्राहकांनी डिजिटल भरणा केल्यास डिजिटल भरणा केल्यास देय रकमेवर 0.25% एवढी सूट दिली जाते. त्यामुळे सध्या राज्यात 70 टक्यांपेक्षा अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पद्धतीने बिलाचा भरणा करत आहेत. ही योजना हे प्रमाण आणखी वाढवण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून महावितरणाच्या प्रत्येक उपविभागीय स्तरावर एप्रिल, मे व जून 2025 या प्रत्येक महिन्यात एकप्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉ मध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.
या योजनेच्या कालावधीत ग्राहकांनी नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी व आरटीजीएस या माध्यमातून वीज बिलाचा भरणा करावा. लकी ड्रॉ काढण्याच्या अगोदर दरमहा एक याप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे गरजेचे आहे. तसेच वीज बिलाची किमान रक्कम 100 रुपये असावी. लकी ड्रॉ घोषित करण्याच्या अगोदर महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची 10 रुपयांपेक्षा कमी असावी. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षीसासाठीच पात्र असणार आहे, असे महावितरद्वारे सांगण्यात आलेले आहे.
या योजनेचा निकाल संबंधित महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महावितरणच्या वेबसाईटवर व नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती जाहीर होणार आहे. विजेते ग्राहक देखील तीन दिवसाच्या आत आपल्याजवळील कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. प्रत्येक बक्षीसासाठी दोन विजेत्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. संपर्क करूनही विजेत्यांनी जर दहा दिवसात प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी व इतर कारणामुळे अपात्र असल्यास प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बक्षीस दिले जाणार आहे. तसेच ही योजना महावितरणच्या विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

