नवीन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणद्वारे करण्यात आलेली आहे. महावितरणकडून ही संकल्पना ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा या अनुषंगाने राबविण्यात येत आहे. त्याप्रमाणे या अगोदर सदर योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना 10 रुपये सूट देण्यात येत होती. परंतु यापुढे पहिल्याच वीजबिलात पुढील बारा महिन्यासाठी एकरकमी सवलत मिळणार आहे. महावितरणतर्फे गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ‘ई-मेल’द्वारे वीजबिल पाठवले जाते.
शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट दिली जाते. महावितरणतर्फे गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा ऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात 120 रुपये सूट दिली जाणार आहे. महावितरणच्या तीन कोटी ग्राहकांपैकी आत्तापर्यंत 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.25 टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेच्या पर्यायाची निवड केलेली आहे. भविष्यात या प्रमाण वाढ व्हावी, या हेतूने महावितरणने गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तात्काळ एकरकमी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
असा निवडा पर्याय-
महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणासाठी सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना एसएमएस पाठवले जाणार आहेत. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर वीज बिलात एकरकमी 120 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृती ई-मेलआयडीवर वीजबिल पाठवण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात 10 रुपये सूट दिली जाणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. ग्रो ग्रीन सेवेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी व गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडावा.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

