ही योजना केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबानासाठी सुरू केलेली आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. तसेच महिन्याला महिलांना 7 हजार रुपये मिळू शकतात, अशी ही योजना आहे. ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया विमा सखी योजना नेमकी आहे ते.
विमा सखी योजना नेमकी काय आहे?-
विमा सखी योजना ही LIC ची खास योजना आहे. या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षासाठी स्टायपेंड मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना एकूण तीन वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कालावधीमध्ये महिलांना एलआयसी (LIC) एजंट म्हणून काम करता येणार आहे. तसेच ज्या महिलांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे, अशा महिलांना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही काम करता येणार आहे.
सदर योजनेच्या अटी-
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेची 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय कमीत कमी 17 व जास्तीत जास्त 70 वर्ष असणे गरजेचे आहे.
- या योजनेच्या माध्यमातून तीन वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल व त्यानंतर त्या महिलांना विमा एजंट म्हणून काम करता येणार आहे.
सदर योजनेत किती पैसे दिले जातील-
विमा सखी योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांची निवड झालेली आहे, त्या महिलांना तीन वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान 2 लाखाहून अधिक मानधन मिळणार आहे. त्यापैकी पहिल्या वर्षी प्रति महिना 7 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी प्रति महिना 6 हजार रुपये व तिसऱ्या वर्षी प्रति महिना 5 हजार रुपये दिले जाणार आहेत. यात कमिशन किंवा बोनसचा समावेश नाही. जे कमिशन किंवा बोनसच्या रूपात पैसे मिळतील ते वेगळेच असतील.
दुसऱ्या व तिसऱ्या वर्षे 6 हजार व 5 हजार मिळण्यासाठी एक अट ठेवण्यात आलेले आहे. पहिल्या वर्षीमध्ये ज्या पॉलिसी काढल्या आहेत, त्यातील 65 टक्के पॉलिसी दुसऱ्या वर्षीही सुरू असल्य पाहिजेत. उदाहरणार्थ जर एखाद्या महिलेने वर्षभरात शंभर पॉलिसी विकल्या तर त्यापैकी 65 पॉलिसी या पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत सुरू राहायला हव्यात. म्हणजेच याचा अर्थ असा की महिलांना केवळ पॉलिसी विकायच्या नाहीत तर त्या चालू राहतील याची देखील काळजी घ्यायची आहे.
सदर योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात-
ज्या महिला एलआयसी कर्मचारी नाहीत व त्यांच्या नात्यातही कोणी एलआयसी कर्मचारी नाही, अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
सदर योजनेचे नियम-
या योजनेच्या माध्यमातून तीन वर्षाच्या ट्रेनिंगनंतर संबंधित महिला एलआयसी एजंट म्हणून नियुक्त होणार आहे. परंतु ती महिला एलआयसीची नियमित कर्मचारी नसेल. तसेच नियमित कर्मचाऱ्यांना मिळणारे कोणतेही लाभ या एजंटला मिळणार नाहीत. ज्या महिलांची विमा सखी म्हणून निवड होणार आहे त्या महिलांना प्रत्येक वर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र (10वी उत्तीर्ण)
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
सदर योजनेची अर्ज प्रक्रिया-
- सदर योजनेचा अर्ज करण्यासाथी सर्वात आगोदर एलआयसीच्या licindia.in/lic-s-bima-sakhi या अधिकृत लिंकवर क्लिक करावे.
- ती लिंक ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटी Click here for Bima Sakhi यावरती क्लिक करावे.
- त्यानंतर त्या ठिकाणी नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता इत्यादी सर्व डिटेल्स भरावेत.
- जर तुम्ही एलआयसीचे एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर यांच्याशी संबंधित असाल तर त्याची देखील इथे माहिती द्यावी.
- त्यानंतर शेवटी कॅप्चा भरून सबमिट बटणावर क्लिक करावे.
सदर योजनेसाठीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. LIC विमा सखी योजना ही विशेषता ग्रामीण महिलांना स्वतंत्र्य व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी सक्षम करणारी आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना विमा एजंट होण्यासाठी 3 वर्षांच्या स्टायपेंडसह प्रशिक्षण दिले जाते. यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरचग्रामीण भागात विम्याची उपलब्धता सुधारण्यास मदत मिळणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

