आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील 12 लाख 87 हजार लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर पर्यंतची रक्कम ही जमा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे. मंगळवारपासून लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटपा सुरुवात केली गेलेली आहे. एकूण 67 लाख महिलांच्या खात्यामध्ये मंगळवारी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटी 34 लाख महिला पात्र आहेत. त्यापैकी 67 लाख महिलांच्या खात्यावर पहिल्या दिवशी ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे.
तर उर्वरितल रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात येत्या एक ते दोन दिवसात जमा करण्यात येणार आहे, असे देखील मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. हा हप्ता 24 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत पात्र महिलांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहेत. ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये दिले जातात. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर या योजनेचे नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते जमा करण्यात आले होते. या योजनेच्या सुरुवातीला 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी फक्त 2 कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरले, तर 12 लाख 87 हजार महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे या महिलांना लाभ मिळालेला नाही.
अलीकडे झालेल्या विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांचां निधी मंजूर करण्यात आलेला आहे. अधिवेशन संपताच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मंगळवार पासून लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु महायुतीच्या घोषणेप्रमाणे 2100 नाहीतर पूर्वीप्रमाणे 1500 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपली आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

