आपल्याला मोबाईलद्वारे जमिनीचे जुने फेरफार, सातबारे व खाते उतारे पाहता येतात. जुनी कागदपत्रे ही खराब किंवा गहाळ होत चालल्यामुळे शासनाने ऑनलाईन पद्धतीने जमिनीची जुनी कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील ही कागदपत्रे पाहू शकता. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची प्रक्रिया.
जुनी कागदपत्रे पाहण्याची संपूर्ण प्रक्रिया-
- सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख किंवा aaplesarkar.mahaonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- त्यानंतर तेथे दोन ऑप्शन दिसतील. एक तर लॉगिन करायचे आहे किंवा लॉगिन नसल्यास नव्याने नोंदणी करायची आहे.
- नव्याने नोंदणी करण्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर त्यामध्ये आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, पत्ता, पिन कोड, तालुका, जिल्हा इत्यादी माहिती भरावी.
- नंतर पासवर्ड क्रिएट करून सबमिट करायचे आहे. आपली नोंदणी होईल.
- त्यानंतर User Id Password ने लॉगिन करावे.
- लॉगिन केल्यानंतर रेगुलर सर्च यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल. त्यात तुम्हाला कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव, दस्ताऐवज व व्हॅल्यू अशा पद्धतीने रकाने दिसतील.
- ज्या कार्यालयाच्यामाध्यमातून कागदपत्रे पाहिजे त्या कार्यालयाची निवड करायची आहे.
- त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव व कोणती कागदपत्रे पहायची आहेत त्याची निवड करावी.
- नंतर आपला सर्वे नंबर टाकायचा आहे व सर्च बटणावर क्लिक करायचे आहे.
- सर्च केल्यानंतर ती संबंधित कागदपत्रे आपल्यासमोर दिसतील. अशा पद्धतीने तुम्ही संबंधित गावबाबत जी कागदपत्रे उपलब्ध असतील ती पाहू शकता.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

