नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा व विधान परिषदेमधील सुधारणा यासंदर्भातील विधायक सादर केले होते. आता या विधायकास विधानसभा व विधान परिषदेत दोन्ही ठिकाणी एकमताने मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता यापुढे 1,2,3,4 किंवा 5 गुंठे अशी जमीन खरेदी करणे किंवा विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 1947 सालापासून सुरू करण्यात आलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आलेले आहे.
परंतु या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांचे हस्तांतरण करण्यास कायद्याने निर्बंध घालण्यात आलेला होता. त्यामुळे 2017 साली केलेल्या सुधारणेनुसार 1965 ते 2017 या कालावधीत झालेले तुकड्याचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25% रक्कम शासन जमा करण्याची अट घालण्यात आलेली होती. पण ही रक्कम सर्वसामान्या नागरिकांनी व्यवहार करणे टाळले. ही अडचण दूर करण्यासाठी विद्यमान सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी 2017 सालापर्यंतची मुदत 2024 पर्यंत वाढविली.
तसेच 25% शुल्काऐवजी 5% शुल्क भरून त्या जमिमनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देखील दिलेली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या समितीने 15 ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्याचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषद व विधानसभेमध्ये हे विधेयक सादर केले होते. या निर्णयाचा मोठा दिलासा हा राज्यातील नागरिकांना मिळाला आहे. याबाबत महसूल विभागाने माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारशीही यासाठी विचारात घेण्यात आलेल्या आहेत.
तुकड्यांच्या खरेदीसाठी शुल्क भरून नियमित करून घेणे गरजेचे-
तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. पण आता त्या तुकड्याचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजारमूल्याच्या 5% शुल्क शासनाला भरून 1,2,3,4 किंवा 5 गुंठ्यांची खरेदी-विक्री आता करता येणार आहे. त्यासाठी नगरपालिका, महापालिकेतील संबंधित अधिकारी किंवा ग्रामीणमधील प्रांताधिकार्यांकडून गुंठेवारी नियमित झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
‘या’ तीन कारणांसाठी मिळेल परवानगी-
- विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी-विक्रीत परवानगी देण्यात आलेली आहे.
- शेती किंवा अन्य रस्त्यासाठीही गुंठ्यांची खरेदी-विक्री करता येणार आहे.
- रहिवासी क्षेत्रात (रेसिडेन्शियल) घर बांधणीसाठी देखील गुंठेवारीच्या व्यवहारास परवानगी देण्यात आलेली आहे.
नोट- वरील माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

