मागेल त्याला सोलर पंप योजनेची वेंडर सिलेक्ट करण्याची प्रक्रिया? अशाप्रकारे निवडा कंपनी!

ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर पंप योजनेचा अर्ज करून शुल्क भरलेला आह अशा शेतकऱ्यांना वेंडर निवडण्याचा ऑप्शन आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाबरोबरच आपल्या आवडीच्या कंपनीचा सौर कृषी पंप ही निवडण्याची मुभा मिळते. काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्यासाठीचा पर्याय आलेला आहे. ज्यांना आलेला नाही त्यांना लवकरच येईल. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया वेंडर सिलेक्शन कसे करावे? म्हणजेच आपल्या आवडीची कंपनी कशी निवडावी याबद्दलची प्रक्रिया.

वेंडर सिलेक्शन करण्याची प्रक्रिया-

  • सर्वात अगोदर महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.
  • त्यानंतर त्यातील लाभार्थी सुविधा हा पर्याय निवडायचा आहे.
  • लाभार्थी सुविधांमध्ये अर्जाची स्थिती तपासावी.
  • त्यानंतर त्यामध्ये आपला अर्ज क्रमांक टाकावा. एमटी आयडी/एमएस आयडी/एमके आयडी या क्रमांकाद्वारे देखील आपण अर्जाची माहिती शोधू शकता.
  • आता आपल्यासमोर सर्व माहिती दिसेल व त्यात आपल्याला आपले पेमेंट पूर्ण झालेले दिसेल.
  • आता तुमच्यासमोर तुमच्या जिल्ह्यातील उपलब्ध वेंडरची निवड करण्यासाठी यादी दिसेल.
  • या ठिकाणी तुम्ही 3 एचपी, 5 एचपी, किंवा 7.5 एचपी क्षेमतेचा वेंडर निवडता येणार आहे.
  • त्यानंतर तुमच्या आवडीचा वेंडर निवडून Assign Vendor या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • नंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला OTP त्यामध्ये टाकून वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
  • तसेच तुम्हाला तुम्ही निवडलेल्या वेंडरच्या कामगिरीचा आढावा देखील घेता येईल. यात वेंडरने तुमच्या जिल्ह्यात कोठे कोठे इन्स्टॉलेशन केलेले आहे याची माहिती पाहता येणार आहे.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची वेंडर सिलेक्शन प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *