आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. निवडणूक पार पडून सरकार देखील स्थापन झाले तरीही डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात अजूनही जमा झालेला नाही त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे.
नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना माहिती दिली आहे. या विधानसभेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी दिला जाणार आहे याबद्दल त्यांनी खुलासा केला आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले.
एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही?
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की मी या निमित्ताने सभागृहाला आश्र्वस्त करू इच्छितो, की कोणतीही शंका मनात ठेवू नका, कारण आम्ही जी जी आश्वासने दिलेली आहेत, ज्या ज्या योजना सुरु केलेल्या आहेत, त्यातील एकही योजना बंद होऊ देणार नाही.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?-
ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवले आहे. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीचा खात्यात जमा केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत?-
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की या योजनेचे निकष बदलले नाहीत. परंतु ते पुढे म्हणाले की काही लोकांनी चार चार खाती उघडली आहेत, असे लक्षात आले आहे. या समाजात चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतात तर काही वाईट प्रवृत्तीचे असतात. एखाद्या योजनेचा चुकीचा पद्धतीने वापर होत असेल, तर हा जनतेचा पैसा आहे तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की या पैशाचा योग्य प्रकारे वापर केला गेला पाहिजे. मागचा काळात आमच्या लक्षात आले आहे की एका माणसाने 9 खाती काढली होती. त्याला लाडकी बहीण कसं बोलणार, तसेच जो बहिणीच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.