राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करावा?

राष्ट्रीय कुटुंब लाभ या योजनेच्या माध्यमातून मृत्यूचे कारण विचारात न घेता घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबांना आर्थिक मदत प्रदान केली जाते. ज्या गरीब घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्या घरातील जो व्यक्ती स्थानिक चौकशीनंतर घराचा प्रमुख आहे असे आढळून आल्यास त्या व्यक्तीला कौटुंबिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ अशा कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर मिळणार आहे ज्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त व 60 वर्षापेक्षा कमी असताना मृत्यु झालेला आहे.

सदर योजनेच्या माध्यमातून कोणास व किती लाभ देण्यात येतो?-

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या माध्यमातून ज्या गरीब घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्या घरातील जो व्यक्ती स्थानिक चौकशीनंतर घराचा प्रमुख आहे असे आढळून आल्यास त्या व्यक्तीला एकरकमी 20000/- रुपये मदत म्हणून देण्यात येते. ही मदत कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला असेल तरी ही मदत देण्यात येते.

सदर योजनेची पात्रता-

  • अर्जदार हा भारत देशाचा नागरिक असावा.
  • अर्जदाराचे कुटुंब दारिद्र रेषेखालील असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती मरण पावलेला असावा.
  • मृत कर्त्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त नसावे व 60 वर्षाहून कमी नसावे.
  • अर्जदार व्यक्ती हा कुटुंबाचा नंतरचा प्राथमिक कमाई करणारा असावा.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

मृत कुटुंब प्रमुखाशी संबंधित कागदपत्रे-

  • मृत्यू प्रमाणपत्र
  • ओळखीचा पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • सदस्य आयडी/ कुटुंब ओळखपत्र

कुटुंब सदस्याशी संबंधित कागदपत्रे-

  • ओळखीचा पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • सदस्य आयडी/कुटुंब आयडी
  • आधार सलंग्न बँक खाते/पोस्ट ऑफिस खात्याचा तपशील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

सदर योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया-

या योजनेच्या लाभासाठी अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येतो.

ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया-

  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा किंवा अर्जाचे फॉर्म जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा तहसील समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे मोफत उपलब्ध आहेत.
  • हा अर्ज योग्यरित्या भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून राज्य सरकारने नियुक्त केलेल्या तहसील समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
  • ते सर्व अर्जांच्या याद्या एकत्रित करतील व ब्लॉक स्तर मंजूर समितीकडे पाठवतील.
  • त्यानंतर प्रकरणे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे महासंचालक समाज कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मंजुरी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया-

या योजनेचा अर्ज उमंग अ‍ॅप डाऊनलोड करून देखील करता येतो किंवा सदर योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील या योजनेचा अर्ज करता येतो.

  • सर्वात अगोदर या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • त्यानंतर मोबाईल नंबर व ओटीपी वापरून लॉगिन करावे.
  • लॉगिन केल्यानंतर नागरिक NSAP शोधता येतो.
  • नंतर ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा व मूलभूत तपशील भरून पेन्शन भरण्याची पद्धत निवडा.
  • सर्वात शेवटी फोटो अपलोड करावा व सबमिट या बटनावर क्लिक करावे.

नोट– अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *