पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे मानधन देणारी नमो शेतकरी महासन्माननिधी योजना राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान केली जाते. आज आपण सदर लेखातून या योजनेच्या माध्यमातून तुम्ही लाभार्थी आहात की नाही याचे बेनेफिशिअरी स्टेटस कसे पाहावे हे जाणून घेणार आहोत?
बेनिफिशिअरी स्टेटस कसे पाहावे?-
- सर्वात अगोदर nsmny.mahait.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे.
- हे स्टेटस नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबरद्वारे देखील पाहू शकता येते.
- जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहिती नसेल किंवा विसरला असेल तर बाजूला दिलेल्या Know Your Registration No. या पर्यायावर क्लिक करावे.
- यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकू शकता. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
- मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी व वर दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकावा.
- यानंतर Get Data या बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर आपल्या समोर शेतकऱ्याचे नाव, त्याचा नोंदणी क्रमांक दिसेल.
- नंतर मुख्य मेनूमध्ये जाऊन आपल्याला मिळालेल्या नोंदणी क्रमांकाने किंवा मोबाईल नंबरने Beneficiary Status पाहू शकता.
- त्यानंतर परत एकदा मोबाईल नंबर टाकून ओटीपी मागवायचा आहे. ओटीपी व कॅप्चा कोड टाकून गेट डेटा या पर्यायावर क्लिक करावे.
- आता आपल्या समोर शेतकऱ्याची सर्व माहिती उपलब्ध होईल. त्यामध्ये नाव, पत्ता याअगोदरचे हप्ते आलेले आहेत का? जर नसतील आले तर का आले नाहीत? याची सर्व माहिती दिसेल.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

