प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसून मोफत वीज योजनेच्या माध्यमातून महावितरण तर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना समजेल की आपल्या प्रकल्पात किती वीजनिर्मिती झाली आहे त्याचबरोबर घरामध्ये किती विजेचा वापर झाला आहे याची अद्यावत माहिती मोबाईल ॲपद्वारे मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ग्राहकांना ही सवलत दिली जात आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष यांनी दिलेली आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी तसेच अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांच्या छतावर बसवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात किती वीज तयार झाली, ग्राहकाने घरात किती वापरली व किती अतिरिक्त वीज ग्राहकाकडून महावितरणला विकली गेली याची नोंद करण्यासाठी एक वेगळा नेट मीटर बसवावा लागतो.
आतापर्यंत याचा खर्च ग्राहकाला करावा लागत होता. परंतु आता महावितरणने ग्राहकांना सोलर नेट मीटर विनामूल्य पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ग्राहकांचे पैसे वाचण्याबरोबरच त्यांना मोबाईल फोनवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिट इत्यादी माहिती दररोज मिळण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने त्यांना वीजवापराचे नियोजन करून वीजबिल शून्य येण्यासाठी नियोजन करण्यास देखील मदत मिळेल. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी www.pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

