महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहायता देणे हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत पूर, दुष्काळ व आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना अर्थसहाय्य पुरवण्यात येते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी या निधीतून अर्थसहाय्य पुरवले जाते.
सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण सूचना-
- डिस्चार्ज झालेल्या/ उपचार पूर्ण झालेल्या खर्चाची प्रतिकपूर्ती म्हणून अर्थसाह्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज करण्याच्या अगोदर खालील शासकीय योजनांसाठी पात्र नसल्यास लाभ घ्यावा.
- रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना/ आयुष्यमान भारत/ राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम/ धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेत लाभार्थी असल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्जात दर्शविलेल्या माहितीशी संबंधित कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अर्जदाराने साक्षांकित करून सोबत जोडणे गरजेचे आहे.
- संशयास्पद किंवा खोटी माहिती दिलेली आढळून आल्यास तो अर्ज रद्द केला जाईल. तसेच कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.
सदर योजनेची कागदपत्रे-
- वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक/प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रामाणित करणे गरजेचे आहे.)
- तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे)
- रुग्णाचे आधार कार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
- रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
- संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे गरजेचे आहे.
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीमध्ये रुग्णालयाची नोंद असल्याची खातरजमा करावी.
- अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे गरजेचे आहे.
- अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC नोंदणी केल्याची पावती जोडणी गरजेचे आहे.
वर दिलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी व आपला अर्ज aao.cmrf-mh@gov.in या ईमेल आयडीवर पाठवावा.
वैद्यकीय मदतीचा फॉर्म भरण्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नांसाठी मदत कक्षाच्या 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

