सदर योजनेची माहिती-
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत राबवण्यात येते. अटल बांधकाम कामगार आवास (ग्रामीण) योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नवीनीकरण किंवा दुरुस्ती करण्यासाठी 2 लाख रुपये पर्यंत बांधकाम कामगारांना अनुदान देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून नोंदीत बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी तसेच अस्तित्वात असलेल्या कच्चा घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास ग्रामीण योजनेच्या माध्यमातून 1,50,000/- रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.
या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे, अशा लाभार्थ्यास जमीन खरेदी व घरबांधणीच्या लागणाऱ्या बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 50,000/- रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. असे एकूण रुपये 2.00 लक्ष अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेस अटल बांधकाम कामगार योजना असे देखील म्हणतात. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगाराला घरखरेदी व घरबांधण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या रु. 6,00,000/- रक्कमेवरील रु.2.00 लक्षपर्यंतच्या व्याज रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते.
सदर योजनेची वैशिष्ट्ये-
- ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे बांधकाम कामगारांना आत्मनिर्भर होण्यास मदत होते व याचा फायदा त्यांचे जीवनमान सुधारण्यास देखील होतो.
- या योजनेतंर्गत लाभार्थी कामगारांच्या कुटुंबीयांस विविध प्रकारचे लाभ दिले जातात तसेच त्यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा केले जातात.
सदर योजनेची लाभार्थी पात्रता-
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा किंवा सलग 1 वर्षापेक्षा जास्त तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- नोंदीत बांधकाम कामगारांचे स्वत:च्या /पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळूने बांधलेले) घर नसावे. असे स्वयंघोषणापत्र/ शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- जर नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधायचे झाल्यास त्याच्याकडे जर अगोदरची मालकीचे कच्चे घर असेल तर त्या ठिकाणी बांधता येते किंवा पती/पत्नीच्या नावे मालकीची जागा असली तरीही बांधता येते.
- त्याचबरोबर शासनाच्या इतर कोणत्याही गृह निर्माण प्रकल्प योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच मंडळामार्फत गृह कर्जावरील व्याज देण्याकरता अर्थसाहयाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा व याबाबतचे शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार आहे.
- एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगारास या योजनेचा लाभा घेता येणार नाही.
- नोंदणीकृत बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- ओळखपत्राची प्रत(सक्षम प्राधिकाऱ्याची)
- आधारकार्ड
- 7/12 उतारा
- बँक पासबुकची प्रत
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- पिवळे रेशनकार्ड/अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड/केशरी रेशनकार्ड/ अन्नपूर्णा रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- मतदान ओळखपत्र
- रहिवाशी पुरावा
- ग्रामपंचायतकडून/ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
सदर योजनेचा अर्ज करण्याची पद्धत-
या योजनेचा अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत mahabocw.in या पोर्टलवर जाऊन किंवा खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयामध्ये जमा करावा.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

