रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत!

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून स्वस्त धान्य मिळावे यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक केले आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने या अगोदरच तसे निर्देश देखील दिलेले आहेत. परंतु तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

जर शिधापत्रिकाधारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशन धान्य मिळणार नाही. तसेच अशा शिधापत्रिकाधारकांची नावे देखील रेशन कार्ड मधून वगळली जाणार आहेत व त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत. आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन शिधापत्रिकेमध्ये नाव असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याने ई-पॉस डिजिटल मशीनमध्ये आधारकार्ड क्रमांक सीडिंग करून घेणे आवश्यक आहे.

फक्त काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येणाऱ्या काळात लाभार्थ्यांच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ देण्यात येणार आहे. प्रत्येक धान्य दुकानात ई-केवायसी प्रक्रिया नि:शुल्क सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन ई-पॉस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी करावी. आधार क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन बंद होणार असल्याची माहिती सूत्राद्वारे सांगण्यात येत आहे.  

पारदर्शकतेचा उद्देश-

ज्या कुटुंबांनी स्थलांतर केलेले आहे त्यांनी देखील ते जिथे वास्तव्य करत असतील त्या ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ई-केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

1 नोव्हेंबरपासून धान्य बंद होण्याची शक्यता-

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरीब गरजूना रेशनधान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई-केवायसीची अट घातलेली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून लागणार आहे. ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. ई-केवायसी न करणाऱ्याचे रेशनधान्य तसेच रेशनकार्ड 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *