लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीच्याद्वारे जमा करण्यात येतात. डीबीटीद्वारे पैसे घेण्यासाठी कोणत्याही एकाच बँक खात्याला आधार लिंक करता येते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाच हप्ते बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे या योजनेच्या माध्यमातून 7 हजार 500 रुपये शासनाने बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा केलेले आहेत. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम हस्तांतरित केली आहे. परंतु योजनेचे पैसे नक्की कोणत्या खात्यात जमा होत आहेत याविषयी अजूनही संभ्रम आहे. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही तुमच्या आधार क्रमांकावरून कसे तपासू शकता.
डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठवण्यात येते. म्हणजेच याचा अर्थ असा की फक्त तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते. यासाठी कोणतेही बँक डिटेल्स तपासले जात नाहीत. त्यामुळे तुमचे आधार कार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे, तसेच बँक खाते सक्रिय आहे की नाही हे तुम्हाला तपासणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडे एकाहून अधिक खाते असल्याने नक्की कोणत्या बँक खात्यात आपली रक्कम जमा होणार आहे याबाबत संभ्रम आहे. परंतु डीबीटी मार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक खात्याला आधार कार्ड लिंक करता येते. आधार कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची तपासणी करणे गरजेचे आहे.
आधार कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे तपासा?-
- सर्वात अगोदर myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.
- त्यानंतर तुमचा 121 अंकी आधार क्रमांक त्यामध्ये टाकून लॉगिन करावे.
- आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारशी लिंक असणाऱ्या तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये भरला की तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसतील.
- आता नवीन पेजवरील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा.
- यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील व त्या शेजारी आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते सक्रिय आहे की नाही हे सुद्धा समजेल.
- तुम्हाला तुमच आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.
- आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे आले आहेत.
नोटा- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.