अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून मुख्य सेविका गट क या पदाची भरती निघालेली आहे. डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मार्फत ही भरती सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएशन पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 102 आहेत.

या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरती फॉर्म भरायचा आहे. या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. त्याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती आपण सदर लेखातून दिलेली आहे. ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे बेरोजगार उमेदवारांनी या योजनेच्या माध्यमातून नोकरीसाठी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

पदाचे नाव- मुख्यसेविका गट- क

रिकाम्या जागा- 102

नोकरीचे ठिकाण- महाराष्ट्र

पगार- 35,400 ते 1,12,400 रु.

वयोमर्यादा- 21 ते 38 वर्ष

फी- खुला प्रवर्ग: रु.1000/-  

मागासवर्गीय: रु.900/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 3 नोव्हेंबर 2024

सदर भरतीची पात्रता-

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असणे गरजेचे आहे.
  • जर अर्जदार उमेदवाराने ग्रॅज्युएशन पेक्षा जास्त म्हणजे उच्च शिक्षण घेतलेले असेल तर अशा उमेदवारांना देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. फक्त ग्रॅज्युएशन पेक्षा कमी शिक्षण असणारा उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही.

सदर भरतीची अर्ज प्रक्रिया-

  • सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. ही वेबसाईट आपण लेखाच्या शेवटी दिलेली आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तेथे तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तेथे लॉगिन करायचे आहे.
  • नंतर Apply Online या लिंकवर क्लिक करावे.
  • तुमच्यासमोर एकात्मिक बालविकास भरतीचा फॉर्म उघडेल.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारलेली आहे ती माहिती व्यवस्थित भरायची आहे. तसेच आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • आता पुढे भरतीसाठी लागणारी फी देखील कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोडच्या माध्यमातून भरायची आहे.
  • फी भरुन झाल्यानंतर भरतीच्या फॉर्मची फेर तपासणी करून घ्यायची आहे. माहिती चुकीची आढळली तर ती दुरुस्त करायची आहे.
  • सर्वात शेवटी फॉर्म Recheck केल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज एकात्मिक बालविकास विभागाकडे सादर करायचा आहे.

सदर भरतीची निवड प्रक्रिया

  • या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असतील त्यांची सर्वात अगोदर ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
  • त्यानंतर ऑनलाईन परीक्षेत उमेदवार पास झाले की पुढच्या टप्प्यांमध्ये उमेदवारांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहेत.
  • त्यानंतर पात्र अशा सर्व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. या अंतिम यादीमध्ये ज्याची नावे आसतील त्यांनाच या भरतीसाठी निवडले जाणार आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

जाहिरात PDF डाऊनलोड येथून करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *