नवीन मोबाईल नंबर रेशन कार्डमध्ये अपडेट कसा करावा?

आपल्या देशातील अनेक लोकांकडे रेशन कार्ड आहे. रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका. शिधापत्रिका हे सरकारी दस्ताऐवज आहे. याचा वापर सरकारी कागदपत्रे काढताना करता येतो. जर रेशन कार्ड असणाऱ्यानी मोबाईल नंबर नवीन घेतला असेल तर तो अपडेट कसा करावा असा प्रश्न अनेक लोकांना पडतो. काही लोक नवीन नंबर घेतल्यानंतर ते अपडेट करायला विसरतात म्हणून त्यांना रेशन मिळत नाही.

कारण रेशन कार्ड बरोबर जो नंबर तुम्ही लिंक केलेला असतो त्यावर ओटीपी येतो. काही कारणास्तव नवीन नंबर रेशन कार्डमध्ये अपडेट केला नसेल तर तो कसा करावा हे आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर घरीबसल्या अपडेट करता येतो. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज भासणार नाही. फक्त या खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे काम करू शकता. रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याच्या खूप सोप्या स्टेप्स आहेत.

रेशन कार्डमध्ये नवीन नंबर कसा अपडेट करावा?-

  • सर्वात अगोदर नॅशनल फूड सिक्युरिटी या nfs.delhigovt.nic.in  पोर्टलच्या वेबसाईटवर जावे.
  • वेबसाईटवर ओपन झाल्यानंतर ‘Citizen’s Corner’ नावाचे एक सेक्शन आहे, तेथे गेल्यावर ‘Register/Change of mobile number या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्यामध्ये घरातील मुख्य सदस्याचा एनएसएफ आयडी टाकावा. जर तो नसेल तर तुमचा आधार क्रमांक तेथे टाकू शकता.
  • त्यानंतर तुमचा रेशन कार्ड क्रमांक तेथे टाकावा.
  • रेशन कार्डवर घरातील ज्या मुख्य सदस्य असे नाव लिहिलेले असेल तेच नाव तेथे लिहावे.
  • वरील सगळ्या स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर तुमचा नवीन मोबाईल नंबर तिथे टाकावा व Save पर्यायावर क्लिक करावे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *