मल्चिंग पेपर अनुदान योजना ही राष्ट्रीय फलोत्पादन यांच्या माध्यमातून राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून फळझाडे व पालेभाज्या पिकांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक मल्चिंग म्हणून वापरण्यात येणारे अनुदान दिले जाते. पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाते. तसेच पिकांमध्ये तणाची वाढ देखील कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांची व पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो.
प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी किती अनुदान देण्यात येते?-
- सर्वसाधारण क्षेत्रासाठी हे अनुदान प्रती हेक्टर रुपये 32,000 आहे. या खर्चाच्या 50 टक्के म्हणजे जास्तीत जास्त 16,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादे पुरते अनुदान देण्यात येते.
- जर डोंगराळ क्षेत्र असेल तर प्रति हेक्टर 36,800 रुपये आहे. या खर्चाच्या 50 टक्के म्हणजे जास्तीत जास्त 18,400 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादितेसाठी अनुदान देय असणार आहे.
सदर योजनेसाठीची सहभागी पात्रता-
- शेतकरी
- बचत गट
- शेतकरी उत्पादक कंपनी
- शेतकरी समूह
- सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊन अर्थसाह्य घेऊ शकतात.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्डची झेरॉक्स प्रत
- पासबुकची झेरॉक्स प्रत
- 7/12 उतारा
- 8- अ प्रमाणपत्र
सदर योजनेचा अर्ज कोठे करावा?-
या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा व या योजनेची अधिक माहिती मिळवावी.
सदर योजनेच्या माध्यमातून विविध पिकांसाठी किती जाडीची प्लास्टिक फिल्म वापरावी?-
- ज्या पिकांना 11-12 महिने कालावधी लागतो अशा फळपिकांसाठी 50 मायक्रोन जाडीची यु व्ही प्लास्टिक फिल्म वापरली जाते.
- 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत येणाऱ्या अशा पिकांना 25 मायक्रोन जाडीची यूवी स्टॅबिलायझर फिल्म वापरली जाते.
- जी पिके जास्त कालावधी घेतात म्हणजेच 12 महिन्यापेक्षा अधिक कालावधी घेणाऱ्या सर्व पिकांसाठी 100 किंवा 200 मायक्रॉन जाडीची यु व्ही स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म वापरली जाते.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
WhatsApp Group
Join Now